प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा इम्पॅक्ट

25

🔹कोकण सचिव महेश महाजन यांच्या माध्यमातून रुग्णांना जीवदान

✒️रत्नागिरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

रत्नागिरी(दि.4मे):-मंडणगड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात अनेक दिवस बंद असलेला इन्व्हर्टर व जनरेटर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोकण सचिव महेश महाजन यांनी एका दिवसात सुरू केला आहे. मंडणगड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचा इन्व्हर्टर व जनरेटर बंद स्थितीत होते त्यांनी ठेकेदाराला फोन लावून एक दिवसात चालू करून घेऊन ग्रामीण रुग्णालयातील कोरोना रुग्ण व इतर रुग्णांना दिलासा दिला आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कार्यतत्पर संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असलेले संघाचे कोकण सचिव श्री महेश महाजन यांनी मंडणगड तालुका ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन तेथील रुग्णांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांना रुग्णालयाचे इन्व्हर्टर व जनरेटर बंद असल्याचे सांगण्यात आले.

त्यानुसार डॉक्टर तसेच कर्मचारी यांच्याजवळ चर्चा केली असता कित्येक महिने पत्रव्यवहार करूनही ठेकेदार याकडे दुर्लक्ष करीत आहे असे सांगण्यात आले त्यानंतर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोकण सचिव महेश महाजन यांनी तात्काळ ठेकेदारांशी संपर्क साधला व त्यांना वीज खंडित झाल्यामुळे रुग्णांचे काय हाल होत आहेत हे समजावून सांगितले हे ऐकून ठेकेदाराने ताबडतोब दुसऱ्या दिवशी इन्वर्टर व जनरेटर चालू करून दिला यामुळे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघाचे कोकण सचिव महेश महाजन यांचे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार व विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.