टरबूजाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने टरबुज उत्पादक आर्थिक संकटात

37

🔹सोसायटी, बँक व पतसंस्थांची डोक्यावर असलेले कर्ज फेडायचे तरी कसे ?

🔸शिवडीचे टरबूज उत्पादक शेतकरी शंकरराव खापरे यांचा संतप्त सवाल

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.7मे):-Covid-19 च्या महामारी ने थैमान घातले असून शेती व शेती व्यवसाय अडचणीत आला असून त्यामुळे शेती करावी की नाही अशा विवंचनेत शेतकरी सापडला असून कोरोनाचा फटका जवळपास सर्वच व्यावसायिकांना बसला आहे.यातून शेती व शेतीवर अवलंबून असणारा घटक देखील सुटू शकलेला नाही. लॉकडाऊनमुळे मेहनतीने व महागडी खर्च करून उत्पादित केलेल्या मालाला बाजार भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांच्या डोक्यावर असलेली बँका ,सोसायट्या, पतसंस्था व उसनवारी कर्ज फेडायचे तरी कसे ? असा असा संतप्त सवाल टरबूज उत्पादक शेतकरी शंकरराव म्हसु खापरे (शिवडी) यांनी शासनाकडे केला आहे.१४ मार्च १५ पासून परकीय व नगदी चलन मिळवून देणाऱ्या द्राक्ष पिकाला कुणाची दृष्ट लागली की काय ?असा एक प्रश्न सर्वच द्राक्ष पंढरी ला पडला असून याहीवर्षी कोरोनाच्या लॉक डाऊन मुळे कवडीमोल भावाने काबाडकष्ट करून व महागडा खर्च करून ही अत्यल्प बाजार भावाने द्राक्ष माल विक्री करावा लागला.

दुष्काळात तेरावा महिना म्हणून द्राक्ष पिका ऐवज फळपिकांकडे द्राक्ष पंढरीतील शेतकरी वळू लागले ला असतानाच उन्हाळ्यात घेतले जाणारी निफाड तालुक्यातील महत्त्वाचे टरबूज हे पीक लोक डाऊन मुळे भावात विकण्याची वेळ टरबूज उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शेतीवर अवलंबून असणारे सर्व घटक अडचणीत सापडले आहे. कोरणा च्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने काही कडक निर्बंध लावले असल्याने राज्य सीमा बंद केल्यामुळे फळ पिकांना ही त्याचा फटका बसला आहे यामुळेच फळ विक्रीला चांगला ब्रेक लागला आहे.सध्या टरबूज उत्पादक मोठ्या कष्टाने पिकवलेल्या या फळाला भाव मिळत नसल्याने हतबल झाले आहे.विक्रीतून उत्पादन खर्चही मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.उन्हाळ्यात खरबूज,टरबूज या पिकांना मोठी मागणी असते.त्या

मुळे शेतकरी मोठ्या आशेने या पिकांची लागवड करतात.फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेले टरबुज पीक एप्रिल व मे महिन्यात तयार झाली.मात्र लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना आठवडे बाजार तसेच बाजार समिती नेऊन विकता येत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.साधारण १५ तेे २० रुपये प्रति किलो भाव असणारे टरबूज सध्या ३ ते ५ रुपये प्रति किलो या मातीमोल भावाने द्यावी लागत आहे.तसेच शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात भेंडी कारली, दोडका, भोपळा, वांगी, आदी भाजीपाला व खरबूज,टरबूज आदींची खरेदी करून व्यापारी शहरात दामदुप्पट दराने विक्री करत आहे.शेतीची मशागत,बियाणे,खते, कीटकनाशके,फवारणी,खुरपणी पाणी देणे,काढणी व वाहतूक यासाठी मोठा खर्च करावा लागला.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी माल तयार झाल्यानंतर सूरत, वापी ,गुजरात, नाशिक ,मुंबई, धुळे, जळगाव, नंदुरबार, दोंडाईचा,अहमदनगर,औरंगाबाद या मोठ्या शहरात विकण्याचा त्यांचा मानस होता.परंतु कोरोनामुळे या आशेवर पाणी फिरले.पिकवलेल्या मालाचा किमान उत्पादन खर्च तरी पदरी पडावा म्हणून त्यांना कवडीमोल भावाने व्यापाऱ्यांना विकावे लागत असल्याने मोठे नुकसान होत आहे.एक एकर टरबूज ची तोडणी करण्यासाठी १० ते १२ मजूर लागतात.सध्या महिला मजुराला ३०० रुपये तर पुरुषाला ५०० रुपये रोजंदारी आहे.तर बियाणे,खते, कीटकनाशक,फवारणी,खुरपणी व मशागत आदीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो.मात्र सध्या कवडीमोल भावाने खरबूज, टरबूज आदींची विक्री करावी लागत असल्याने किमान उत्पादनखर्चही निघत नाही.

टरबुज पिकाला एकरी ७० ते ८० हजार रुपये खर्च-
टरबूज पिकाला सर्वप्रथम पाण्याची उपलब्धता बघून पीक घ्यावे लागत असून एकंदरीत बियाणे त्याचबरोबर औषधे ,लिक्विड खते आदींचा एकंदरीत ७० ते ८० हजार रुपये खर्च येत असून आजच्या बाजारभावाचा विचार केला तर फारसा फायदा होताना दिसत नाही. त्याचबरोबर टरबूज पिक तोडणी चा मजुरी खर्च व बाजारपेठेत विक्रीसाठी माल नेताना चा वाहतूक खर्च याचा एकंदरीत विचार केला तर सद्यस्थितीत हे पीक परवडत नाही. सद्यस्थितीत लागवड केलेले टरबूज पीक पूर्णता विक्री साठी तयार झाले असून लॉकडाउनच्या कारणामुळे चार रुपये किलोने व्यापारी मागत असल्याने विक्री १४ ते १६ टन निघणाऱ्या टरबुजाचा या बाजार भावाने विचार केला तर वीस ते पंचवीस हजार रुपये विक्री तोटा संभवत आहे.
अमोल खापरे (शिवडी).