माळी समाजावरील गुंडगीरी सहन केली जाणार नाही – गोविंद यादव

26

🔹समाजाची जागा बळकावण्याचे गावगुंडांचे प्रयन्त

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

डिघोळ(दि.8मे):- येथे विविध उपक्रमांसाठी माळी सामाजाने जागा राखीव ठेवलेली आहे. ही जागा बळकावण्यासाठी काही लोक दादागीरी करत आहेत. त्यांची ही गुंडगीरी सहन केली जाणार नाही. प्रसंगी जशास तसे ऊत्तर दिले जाईल, असा ईशारा गंगाखेड तालुका कॉंग्रेस अध्यक्ष तथा अ. भा. महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा ऊपाध्यक्ष गोविंद यादव यांनी दिला आहे. या प्रकरणात पक्षपातीपणाची भूमिका घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही यादव यांनी केली आहे.

सोनपेठ तालुक्यातील डिघोळ ( दे. ) येथे माळी समाजाच्या सामाईक जागेच्या वादातून समाजबांधवांवर हल्ला करण्यात आला. यावेळी परळीहून आणलेल्या भाडोत्री गुंडांकडून महिलांनाही मारहाण झाल्याची घटना घडली. गोविंद यादव, धनगर साम्राज्य सेनेचे अध्यक्ष सखाराम बोबडे यांनी आज डिघोळ येथे भेट देवून जखमींची भेट घेतली. ‘त्या’ जागेची पाहणी केली. तसेच तहसीलदार डॉ निलेश बिराजदार यांची भेट घेत योग्य कारवाईची मागणी केली.

डिघोळ येथील संत सावता माळी मंदिरात समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना संयम राखण्याचे आवाहन यादव यांनी केले. हाणामाऱ्यांचे प्रकार चूकीचेच आहेत. परंतू आपल्यावर कोणी दादागीरी करत असेल तर प्रसंगी त्यांना त्याच प्रकारे ऊत्तर देण्याची तयारी ठेवावी लागेल, असेही गोविंद यादव यांनी स्पष्ट केले. या जागेवर समाजपयोगी ऊपक्रम राबवण्याबाबत यावेळी ठराव करण्यात आला. या अनुषंगाने लवकरच आ. सुरेश वरपुडकर यांची भेट घेवून या जागेच्या विकासासाठी निधी ऊपलब्ध करून घेण्याची ग्वाही यादव यांनी दिली.

बाहेरून आणलेल्या गुंडांकडून महिलांना मारहाण झालेली असतानाही जखमी महिलांनाच आरोपी करण्यात आले. या प्रकरणात सोनपेठ पोलीसांची भूमिका पक्षपातीपणाची असल्याने पो. नि. शेळके, बीट जमादार आडे यांच्यावर कारवाईसाठी आपण लवकरच जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट घेणार असल्याचे गोविंद यादव यांनी सांगीतले आहे. यावेळी माजी सभापती दत्तराव शिंगाडे, माजी सरपंच गोकुळदादा आरबाड, नामदेव शिंगाडे, बन्सी शिंगाडे, शिवाजी शिंगाडे, भिमा शिंगाडे, माणिक गायकवाड, सचिन शिंगाडे, विश्वनाथ ढगे, शिवाआप्पा शिंगाडे, आकाश शिंगाडे, नागनाथ शिंगाडे, आरुण शिंगाडे आदिंची ऊपस्थिती होती.