कोरोनाची दुस-या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करा – सभापती सुवर्णाताई जगताप

26

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)

नाशिक(दि.7मे):-जगभर थैमान घातलेल्या covid-19 या संसर्गजन्य विषाणूने शहरी भागात ग्रामीण भागातील सर्व नागरिक भयभीत झाले असून कोरोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व करून आला हरविण्यासाठी प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबाची खबरदारी घेणे गरजेचे आहे. आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी विनाकारण बाहेर फिरणे टाळावी मास्क चा वापर करावा सनी टायझर वापर करून सोशल डिस्टन्स अवलंब करणे सद्यस्थितीत महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातही बरीच गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून ग्रामीण भागातील जनता त्यामानाने बेसावधपणे जगत आहे.

कोरोना चा दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करा.तसेच होम क्वारंटाईन केलेली व्यक्ती पूर्ण १४ दिवसांचा कालावधी पूर्ण होण्याअगोदरच सुपर स्प्रेडर म्हणून विनाकारण फिरताना दिसत असून आपल्या व आपल्या परिवारासाठी विनाकारण फिरू नये असे आव्हान लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णाताई जगताप यांनी केले आहे.ग्रामीण व शहरी भागासह घरीच होम क्वारंटाईन केलेली लोकं पाच ते सात दिवसात बाहेर पडुन सुपर स्प्रेडर ठरत आहेत.होम क्वारंटाईन केलेली कोवीड पेशंट ही १४ ते १७ दिवस सामान्य लोकांच्या संपर्कात न येता सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे.

कोवीड पाॅजीटिव पेशंट हा १२ ते १४ दिवस सामान्य निरोगी व्यक्तीस संसर्ग पसरवु शकतो.मला काही लक्षणं नाहीत,मी आता बरा आहे,मला काहीच त्रास नाही होत,मला दम पण नाही लागत,माझं सॅच्युरेशन ही नाॅर्मल आहे अशी कारणं सांगत ५ ते ७ दिवसात घराच्या बाहेर पडुन सुपरस्प्रेडरची भुमिका निभावत आहेत. परंतु आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी किमान १४ दिवस तरी होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीने आपल्या घरी सुरक्षित राहणे फायद्याचे आहे. सद्यस्थितीत लसीकरणाचा वेग मंदावला असून लसीचा प्रचंड प्रमाणात तुटवडा आल्याने यापुढील काळात पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींची ४५ दिवसानंतर होणाऱ्या दुसऱ्या बूस्टर डोस साठी अगोदर प्राधान्य दिले जाईल असा प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे त्यामुळे वेळीच सावध होणे तितकेच गरजेचे आहे.

आपण प्रशासनाला वा सरकारला दोष देत बसण्यापेक्षा आपण प्रशासनाला काय मदत करु शकतो हा विचार केला पाहिजे.सरकार, प्रशासन त्याच्या पातळीवर पुर्ण पणे काम करतंय,आपण प्रशासनाच्या पुर्ण पणे पाठीशी उभं राहिलं पाहिजे.होम काॅरंटाईन पेशंट ने चौदा दिवस घरात आयसोलेशन मध्ये राहुन प्रशासनाला मदत केली पाहिजे व सुपर स्प्रेडर म्हणून बाहेर पडले नाही पाहिजे.सुपर स्प्रेडर स्वतःच्या परिवारासाठी ही घातक आहेत व समाजासाठीसुध्दा.होम काॅरंटाईन कोवीड पाॅजीटिव्ह असलेल्या व्यक्तीने सामाजिक जबाबदारी म्हणून व प्रशासनाला आपली मदत म्हणुन खारीचा वाटा उचलुन सुपर स्प्रेडर बनुन बाहेर फिरु नका व आपला १४ ते १७ दिवसांचा होम क्वारंटाईन पीरियड घरात राहुन पुर्ण करा असेही आवाहन सुवर्णा जगताप यांनी केले आहे.