देगलूर येथे कॉग्रेस पक्षाची बैठक

24

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७.

देगलूर(दि.10मे):- आज देगलूर येथे राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती.हि बैठक कै.रावसाहेब अंतापूरकर यांच्या निवासस्थानी घेण्यात आली आहे.या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे आमदार मा.अमरनाथ राजूरकर,राष्ट्रीय युवक कॉग्रेस प्रदेश सरचिटनिस जितेश अंतापूरकर,जि.प.समाजकल्याण सभापती अॕड.रामराव नाईक,शिक्षण व आरोग्य सभापती मा.संजयजी बेळगे,राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.प्रितमजी देशमुख हणेगावकर,पंचायत समिती सभापती संजयजी वलकले,जिल्हा परिषद सदस्य मिसाळे गुरूजी , देगलुर बिलोली विधानसभा युवक कॉग्रेस तालुकाध्यक्ष जनार्धन बिरादार,पं.स.सदस्य राजकूमार हंदिखेरे,खालेद चाऊस,आनंद पाटील खानापूरकर व देगलूर तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील सरपंच पदाधिकारी यांची बैठक घेऊन देगलुर- बिलोली पोटनिवडणूकीच्या तयारीची सुचना देण्यात आले आहे.

मागील माहिण्यात दि.९/४/२०२१ रोजी कै.रावसाहेब अंतापूरकर यांचे दुःखद निधन झाल्यामुळे देगलूर-बिलोली मतदारसंघ येथील जागा रिक्त असल्यामुळे येथील पोटनिवडणूकीची तयारी करण्यासाठी या भागातील सर्व पदाधिका-यांची बैठक बोलावून जितेश अंतापूरकरला निवडून आणण्याचे आश्वासन दिले आहेत.यावेळी मा.आमदार अमर राजूरकर यांनी सर्व पदाधिका-यांना योग्य मार्गदर्शन केले .