प्लाझ्मा दान करण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा ,अनेकांना जीवदान मिळेल :- डॉ संतोष मुंडे

19

✒️अतुल बडे(परळी वैजनाथ प्रतिनिधी)

परळी(दि.9मे):- राज्यात कोविडच वाढता प्रादुर्भाव पाहून अनेक लोकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे तेव्हा लोकांनी भीती न बाळगता संयम आणि आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी म्हंटले आहे ते पुढे म्हणले आहेत ज्या लोकांना कोविड होऊन गेला आहे ते आता पूर्णपणे बरे आहेत अश्या लोकांनी पुढाकार घेऊन प्लाझ्मा दान करावा जेणे करून आपल्या प्लाझ्मा दान केल्यामुळे एखाद्याला नवंजीवन मिळेल अश्या सर्व लोकांनी प्लाझ्मा दान करावा व असल्या संकटात प्लाझ्मा दान करून एक आदर्श आपल्या समाजापुढे ठेवावा प्लाझ्मा दिल्यामुळे अनेक लोकांना रेमडीसीमवर इंजेक्शनची जास्त अवश्यकता लागणार नाही त्या मुळे इंजेक्शनची होणारा तुटवडा भासणार नाही तेव्हा सर्व प्लाझ्मा दान करणाऱ्या लोकांनी पुढाकार घेऊन प्लाझ्मा दान करावे असे मत डॉ संतोष मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

कोरोनाग्रस्ताला जीवदान मिळू शकते अशा प्लाझ्मा दानाबाबत कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी प्लाझा देऊन कोरोना बाधित रूग्णाला जीवदान द्यावे. आरोग्य विभागाकडे प्लाझ्मा दानासाठी जनजागृती करण्यावी व सध्याच्या बिकट परिस्थितीत कोरोनामुक्त झालेल्यांनी पुढाकार घेऊन प्लाझ्मा दान करावा तसेच कोरोनावर मात केलेल्या रूग्णांनी विशिष्ठ वेळेनंतर प्लाझ्मा दान करून कोरोना बाधितांना जिवदान देण्याचे पुण्य केले पाहिजे. कोव्हिड सेंटरमधील व कोरोनावर योग्य उपचार घेऊन बाहेर पडणाऱ्या रूग्णांनीही प्लाझ्मा दानात योगदान देण्याचे आवश्यक आहे.

अंबाजोगाई येथील स्वा.रा.ती. रुग्णालयात प्लाझ्मा युनिट देखील आहेत. याठिकाणी अॅन्टीबॉडीज तयार असलेल्या आणि कोरोनामुक्त असलेल्या नागरिकांना प्लाझ्मा दान करता येऊ शकते. अनेक कोरोनाग्रस्तांना प्लाझ्मा लागू होत आहे. त्यातून अनेकांना जीवदानही मिळू लागले आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागाने देखील लक्ष देऊन प्लाइमा दानाबाबत जनजागृती करणे अपेक्षित आहेत. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा ५७ हजार ४३३ इतका झाला दुसऱ्या लाटेत अनेक कोरोनाग्रस्तांच्या जीवदानासाठी कामी येत आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.
———-
प्लाझ्मा म्हणजे काय ? प्लाझ्मा हा रक्तातील एक पिवळसर द्रव घटक असुन त्याचे रक्तातील प्रमाण 55 टक्के इतके असते यामुळे माणसाच्या जीवनावश्यक घटकद्रव्ये , पेशी आणि विशेषतः प्रथिने असतात.

प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय ? कोरोना आजारातून संपूर्णतः बऱ्या झालेल्या व्यक्तीचा सुमारे 28 दिवसानंतर प्लाझ्मा काढून तो प्लाझ्मा, कोरोनामुळे गंभीर स्थितीत असलेल्या व्यक्तीला देण्याची प्रक्रिया म्हणजे प्लाझ्मा म्हणजे प्लाझ्मा थेरपी होय.
प्लाझ्मा दान बद्दल काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे…
एक रक्तदाता किती मिली प्लाझ्मा दान करू शकतो? • साधारणपणे ४०० मिली प्लाझ्मा दान करू शकतात. एका गरजू व्यक्ती ला किती मिली प्लाझ्मा देण्यात येतो १ – एका रुग्णाला एका वेळी २०० मिली प्लाझ्मा देण्यात येवु शकतो. एकदा प्लाझ्मा दान केल्यानंतर पुन्हा किती कालावधी नंतर रक्तदाता प्लाझ्मा दान करू शकतात? • सुमारे ७ ते १५ दिवसानंतर पुन्हा दान करू शकतात.

प्लाझ्मा दान कोण करू शकतात?
ज्यांचे वय १८ ते ६० दरम्यान आहे. ज्यांचे वजन ५० किलोपेक्षा जास्त आहे. • जी व्यक्ती कोरोना आजारातून पूर्ण बरी झालेली असून डिस्चार्ज किंवा होमकोरोनटाईनच्या सुमारे २८ दिवसानंतर प्लाझ्मा दान करू शकतात – थायरॉईड, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेले व्यक्ती सुध्दा रक्तपेढीतील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्लाझ्मादान करु शकतात.

प्लाझ्मा दान केल्याने कोणते दुष्परिणाम होतात का ?
कोणतेही दुष्परिणाम होत नाही. • रक्तादात्याने दान केलेला प्लाझ्मा
शरीर काही तासात पुन्हा बनवत असते. – कोरोनातून पूर्णपणे ब-या झालेल्या व्यक्ती मध्ये कोरोना विषाणू विरुद्ध प्रतिकारशक्ती तयार झालेली असल्यामुळे प्लाझ्मा दान केल्याने गंभीर रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अत्यंत उपयोगी असते.

कोरोना आजारातुन बरी झालेली व्यक्ती किती दिवसांपर्यंत प्लाझ्मा दान करू शकते?

कोरोना आजारातुन संपूर्णतः बरी झालेली व्यक्ती सुमारे ३/४ महिन्यापर्यंत प्लाझ्मा दान करु शकतात. (पहिले १४ दिवस आणि बरे झाल्यानंतरचे २८ दिवस सोडुन नंतर)

प्लाझ्मा दान केलेला प्लाझ्मा किती दिवसांपर्यंत वापरात येवु शकतो?रक्ता मधुन प्लाझ्मा वेगळे काढून
ते शीत करून प्रक्रियेद्वारे गोठवले जातात.ज्या दिवशी हे प्लाझ्मा रक्तातून वेगळे काढले जातात. त्या दिवसापासून सुमारे एक वर्षापर्यंत ते साठवले जावु शकतात.

प्लाझ्मा दान करण्यासाठी अंदाजे किती वेळ लागतो?
प्लाझ्मा दान करण्यापूर्वी काही तपासण्या कराव्या लागतात. त्यासाठी अंदाजे एक ते दिड तास लागतो आणि प्लाझ्मा काटुन घेतल्यानंतर लाल रक्तपेशी व इतर उर्वरित घटक पुन्हा शरीरात सोडल्या जातात त्यासाठी सुमारे एक ते दिड तास लागतो.