मुक्या व भटक्या जनावरा करिता पाणवठे बांधा:-डॉ नंदकिशोर मैंदळकर

34

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मूरसा(दि.10मे):-चंद्रपूर सह संपूर्ण विदर्भ पुन्हा एकदा प्रचंड तापू लागला विदर्भात उष्णतेची लाट आली असून भविष्यात वाढण्याची शक्यता आहे.मानवाच्या अंगाची लाही लाही होते तिथे मुक्या व भटक्या प्राण्याचे चारा पाण्याविना काय हाल होत असतील कल्पना करा.

मानवाने पाणी,जेवण मागितले तर त्यांना मिळेलही परंतु मुक्या जनावरांना चारा,पाणी सोडा त्यांना मारतात खरं तर पाणपोई,पानवठ्याची गरज मुक्या प्राण्यांना आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी उपसरपंच पांडुरंग खरवडे,पशु वैद्यकीय अधिकारी डॉ नंदकिशोर मैंदळकर,नानाजी बोधले,पांढरी नांदे,सचिन झाडे,गजानन पिंपळकर,रोशन दुडुरे, वामन पिंपळकर,सचिन पारखी,विजय नांदे,राहुल ठेंगणे,सुधाकर नांदे,शैनेश्वर पचारे,अनिल बोढले, गजानन भगत आदी उपस्तीत होते.

यावेळी डॉ नंदकिशोर मैंदळकर म्हणाले की वातावरणातील तापमानात प्रचंड वाढ होत आहे या उष्णतेत जनावराच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे त्यांना मुबलक चारा व स्वच्छ पाणी मिळत नाही,बिगर चारा पाण्याने जनावरे अशक्त होतात त्यांचा जीव कासावीस होतो अशा जनावरांना मारू नका मारहाण झाल्यास त्यांना प्राण गमवावा लागतो.मानवा करिता पाणपोई लावण्यास बऱ्याच संघटना पुढाकार घेतात परंतु मुक्या व भटक्या प्राण्याकरिता पाणवठे बांधून बघा तो आत्मिक आनंद पैशानेही विकत घेता येत नाही,तो आनंद वेगळीच ऊर्जा देऊन जातो.शहरात प्रत्येक वार्डात व खेड्यात किमान दोन पाणवठे बांधावे तिथे मुक्या जनावरांना तहान भागविता यावी.

या ईश्वरीय कार्यात सढळ हाताने मदत करा व पाणवठे बांधा पाण्याविना मुके पशु पक्षी हतबल ठरत आहेत,परिणामी त्यांना नदी,नाले,बोअरवेल,नाल्या ओढ्यातील घाण पाणी पिऊन पशुपक्षी रोगग्रस्त होत आहे.त्यांना जगू द्या त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे तो हिराऊ नका पाणवठे बांधून आनंद मिळवा Vव पशुपक्षांना जगू द्या मुक्या प्राण्यांविषयी आपले कर्तव्य पार पाडा ही काळाची गरज आहे.