निसर्ग आणि जीवन टिकवायचे असेल तर 5जी, 6जी नेटवर्कवर बंदी घाला – राहुल साळवे

31

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)

नांदेड(दि.13मे):- सध्या राज्यासह संपूर्ण भारतात फास्ट इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे, आणि यासाठीच देशातील विविध टेलिकॉम कंपन्यांनी 2G, 3G, 4G आणि आता नव्याने सुरू होणा-या 5G हाई स्पिड इंटरनेटच्या ट्रायलसाठी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन आणि भारत सरकारने टेलिकॉम सर्व्हिस प्रोवाईडर्सला 5G ट्रायलसाठी परवाणगी दिली आहे आणि या परवानगीमध्ये स्पष्ट म्हटले आहे की, टेलिकॉम कंपन्यांना शहरी सेटिंग्स शिवाय ग्रामीण आणि अर्थ शहरी सेटिंग्समध्ये टेस्टिंग करावे लागेल परंतु सध्या राज्यासह संपूर्ण भारतात कोरोना या महामारीचा उद्रेक होत आहे त्यामुळे नागरिकांत वेगवेगळ्या तर्क वितर्कच्या माध्यमातून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आणि यातच अशा हाई स्पिड ट्रायलची काय गरज? मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल, जंगल तोड यामुळे दुषीत वातावरण होत आॅक्सिजनचा अभाव होत आहे परीणामी माणसे हि दगावत आहेत. आज सर्वींकडे आॅक्सिजनचा अभाव जाणवत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राहुल सिताराम साळवे यांनी म्हटले आहे ते पुढे म्हणाले की, 5G नेटवर्क आणि कोरोना महामारीचा कुठेही संबंध नसला तरी आज अशा हाई स्पिड नेटवर्कमुळे पर्यावर्णासह जीव-जंतू आणि निसर्ग नक्किच धोक्यात आले आहे.

कारण देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पासून ते हल्ली अशा टेलीकाॅम कंपन्या अस्तीत्वात येण्यापर्यंत सर्व ऋतुमान.जीव – जंतू आणि सृष्टी सुरक्षीत अबाधीत होती परंतु मागील काही दिवसांपासून बघीतले तर चिमण्या, कावळे,कबुतरे यासह ईतर अनेक छोटे मोठे पक्षी नष्ट झाले आहेत असे अनेक पक्षी, जीव- जंतू आहेत ज्यांचे नामशेषच शिल्लक राहिले आहेत अशातच कोंबड्यांचे होणारे मोठ्या प्रमाणावरचे मृत्यू ज्याला आपण बर्ड फ्ल्यू म्हणलो त्या मृत्यूचे प्रमाण हि एकाएकिचे थांबले त्याआधी स्वाईन फ्ल्यू होता तो हि नष्ट झाला.माकड ताप,चिकण गुणीया अशा एक ना अनेक भयावय नावांचे रोग आले आणि गेले परंतु मानवी जीवनावर श्वसनाचे वाढत असलेले विकार,छोटे मोठे आजार आणि आता मानवांचे मृत्यू यास जरी कोरोना महामारी जबाबदार असली तरी यास कुठे ना कुठे तरी टेलिकॉम कंपन्यां हि जबाबदार असल्याचे चित्र आहे, सुरूवातीला याच कंपन्यांकडून लाईफ टाईम सिम कार्ड वितरीत केले आणि आता दरमहा पैसे उकळत आहेत आणि कोट्यवधी रूपये कमवित आहेत.

अशा कंपन्यांवर तर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पाहिजे जे सुरूवातीपासुनच जनतेची फसवणूक करत आले आहेत ,आज देशातील नागरिकांना स्वच्छ व सुंदर निसर्गरम्य भारत हवे तर युवा पिढीला हाई स्पिड नेटवर्क नकोय तर हाताला रोजगार,सरकारी नौकरी हवी असल्याचे आणि सध्या मोठ्या प्रमाणात खाजगीकरण करण्यात येत असल्याचे राहुल साळवे यांनी म्हटले आहे आज देशाचा आधारस्तंभ तरूण युवा पिढी यांच्या समोर वाढत्या बेरोजगारीचे संकट उभे आहे त्यांना नव – नवीन रोजगाराच्या संधीसह, शासकीय नौकर्यांची आवश्यकता आहे, शेतकरी राजाला निसर्ग टिकुन राहण्यासाठी निसर्गाची साथ हवी त्यांचे उत्पादन वाढिवर लक्ष ठेवले पाहिजे यासह देशातील वाढती गरीबी आणि त्यांचे उत्पन्न यावर आळा बसविला पाहिजे ना कि टेलिकॉम कंपन्यांच्या उत्पादनावर असे राहुल साळवे म्हणाले ते पुढे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा जय जवान जय किसानचा नारा होता तो कायम टिकविला पाहिजे तसेच असे हाई स्पिड नेटवर्क वापरणाऱ्यांची संख्या हि फार कमी आहे आणि देशातील असे हि लोक आहेत ज्यांच्याकडे अद्याप साधा मोबाईल सुद्धा नाही.

त्यामुळे मोजक्याच लोकांसाठी सरकारने निसर्ग आणि जीव धोक्यात न घालता असे नेटवर्क वेळप्रसंगी सर्व बाबींचा सखोल अभ्यास करूनच याचा निसर्ग व मानवी जीवनासह सर्व सुक्ष्म जीव – जंतुवर परीणाम होणार नाही याची खात्री करूनच नंतर निर्णय घ्यावा कारण या प्रतीस्पर्धात्मक युगात 6G आणि 7G नेटवर्क हि लवकरच स्थापन होतील असे राहुल साळवे यांनी एका प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे आणि याबाबत देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या त्या सर्वांना पत्र व्यवहार करणार असल्याचे राहुल साळवे यांनी म्हटले आहे.