अपघातात मरण पावलेल्या मिल कामगाराच्या कुटुंबियाला मिळाली पाच लाखांची तात्काळ मदत

    37

    ✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

    हिंगणघाट(दि.13मे):-आज गुरूवारला वणी येथील गिमाटेक्स इंडस्टीज च्या समोर मिल मधील कामगार श्री स्व. आकाश मुन वय २८वर्ष रा. वणी , हल्ली मुक्काम आदर्श नगर हिंगणघाट याचा सकाळी ७.३० वाजता हैदराबाद नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर हैदराबाद येथुन मध्य प्रदेश येथे धानाची पँडी घेवून जाणारा ट्रक अनियंत्रित झाल्यामुळे टक खाली दबून अत्यंत दुर्दैवीपणे जागेवरच मृत्यू झाला व त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला.

    त्याला न्याय मिळवून देण्यासाठी मा. आमदार समिरभाऊ कुणावार, कामगार नेते व हिंगणघाट बाजार समिती सभापती श्री अँड. सुधीरबाबु कोठारी, माजी आमदार श्री राजुभाऊ तिमांडे, इंटुक सरचिटणीस आफताबभाई खान, उपविभागीय अधिकारी, श्री चंद्रभानजी खंडाईत साहेब, तहसीलदार श्री श्रीरामजी मुंदडा , कंपनीच्या वतीने फँक्टरी मँनेजर श्री शाकीरजी पठाण साहेब व ठाणेदार श्री संपतजी चव्हाण , कामगार प्रतिनिधी व मृतक कामगाराचे कुटुंबिय यांची हिंगणघाट येथील उपविभागीय कार्यालयात बैठक पार पडली.

    चार तास चाललेल्या मँराथान चर्चेनंतर बैठक यशस्वी होवून सर्वांच्या संयुक्त प्रयत्नाने मृतक कामगारांच्या कुटुबियांना गिमाटेक्स कंपनी, वणी व्यवस्थापनाच्या वतीने पाच लाखांची तात्काळ मदत मदत देण्यात आली तसेच मृतक कामगाराच्या पत्नीला व मुलीला पेंशन व इंशुरन्स लाभ, मय्यती करीता १५०००ते २०००० ची मदत तसेच ट्रक मालक व कामगारांच्या वतीने सुद्धा मदतीचे आश्‍वासन देण्यात आले.

    मृतक कामगाराच्या कुटुंबामध्ये त्याची पत्नी, तीन वर्षाची मुलगी व आई आहे. यावेळी संपूर्ण वणी गाव व कंपनीतील कामगार मोठ्या संख्येने कंपनी बंद पाडण्याकरीता जमा झाले होते .परंतु पोलिसांच्या समय सूचकतेमुळे पुढील अनर्थ टळला. सर्व मान्यवरांचे उपस्थितीत पाच लाखाचा चेक व इतर कंपनीतर्फे लाभांचे लेखी आश्वासन मृतक कामगाराच्या कुटुंबियांना देण्यात आले .मृत कामगाराला न्याय मिळवून दिल्याबद्दल सर्व कामगाराच्या वतीने कुटुंबियांच्या वतीने सर्वाचे आभार मानण्यात आले.