नर्सिंग नाशिक युनरसिटी मधुन ब्रम्हपूरी ची शेजल प्रथम

29

🔸 नर्सिंग शिक्षक संघाच्या वतीने ऑक्सिजन विडिओ विजेता

🔹नर्सिंग दिनाच्या निमित्ताने प्रमाणपत्र व रोख पारितोषिक

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपूरी(दि.13मे):- नर्सिंग शिक्षक संघ भारत यांच्या संयुक्त कल्पनेतून ऑक्सिजन लेवल कोविड १९ मध्ये कसे वाढवावे.याचे विडिओ बनवून पाठविण्यात आले.यात ब्रम्हपूरी तालुक्यातील उदापूर येथील शेजल ललित कांबळे ही विद्यार्थ्यांनी नाशिक युनरसिटी नागपूर येथे नर्सिंग शिक्षण घेत आहे.

यात तीने सहभाग घेतला . आपल्या शिक्षणाच्या गुणवत्तेच्या आधारावर तीने ऑक्सिजन लेवल कोविड 19 मध्ये कशी वाढवता येईल यांची माहिती विडिओ व्दारा दिली.नर्सिंग शिक्षक संघ कर्नाटक व प्राध्यापक आणि आर वि नर्सिंग कॉलेज बैंगलौर यांच्या कडुन आपला अमुल्य वेळ देऊन आणि निष्पक्ष निर्णय घेऊन ब्रम्हपूरी तालुक्यातील शेजल कांबळे ही देशातुन पाचवी तर नाशिक युनरसीटी मधुन प्रथम क्रमांक पटकावला आहे.

पंकज सिंघल एम एम सी नर्सिंग असोसिएशन प्राध्यापक संघ मध्यप्रदेश यांच्या कडून प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.नर्सिंग दिना निमित्ताने शेजल चे सर्व स्तरावरुन अभिनंदन केले जात आहे.आज नर्सिंग दिवस असुन आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना कोविड रुग्णांसोबत राहून साजरा करण्यात येतो आहे.