लॉकडाऊन वाढतच आहे; बँकेची हप्ते वसुली थांबवा- नंदू गट्टूवार यांची मुख्यमंत्र्यांना मागणी

    41

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    चंद्रपूर(दि.17मे):-संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात कोरोना च्या वाढत्या प्रार्दुभावामुळे अत्यावश्यक सेवा वगळता मागील महिन्याभरापासून इतर सर्व व्यवसायांना टाळे लागले आहे. लहान मोठे सर्वच व्यवसाय बंद असल्यामुळे आर्थिक उलाढाल बंद झाली आहे. अशा विविध व्यवसायांमध्ये काम करणारा कामगार वस्तीतील मालक खाजगी विनाअनुदानित शाळा संस्थापक शिक्षक, शिकवणी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. असे असले तरी बैंकाचा मासिक हप्ते वसुली वर कोणतेही निर्बंध लावले नसल्यामुळे महिला बचत गट व्यवसायासाठी घेण्यात आले कर्ज वैयक्तिक कर्ज, वाहन कर्जआदींची मासिक हप्ता वसुली जोरात सुरू आहेत हाताला काम नसल्यामुळे बँकेचे हप्ते कसे भरावे असा प्रश्न सर्वसामान्य ते मोठे व्यापारी या सर्वांनाच पडले आहे.

    मासिक हप्ता भरून घेण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने संवाद साधणे कोर्टकचेऱ्या, पोलीस केसच्या धमक्या देणे, अधिनियमान्वये पद्धत वापरणे आदि गोष्टी ठिकठिकाने सरासर ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यावर शासनाचे कोणतेही निर्बंध असू नये हा प्रश्न मात्र सर्वसामान्य जनतेला सतत सतावत आहे.15 मे पर्यंत असणारा लॉकडाउन कालावधी पुन्हा एकदा एक जून पर्यंत वाढविण्यात आला आहे. कोरोनाचि वाढती संख्या लक्षात घेता यालादेखील सर्वसामान्य जनता व्यापारी कामगार पाठिंबा देत आहे असे असेल तरी नियमित सुरू असलेल्या बँक हप्ता वसुलीचे काय?

    त्यावर निर्बंध कधी घातले जाणार असे देखील प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेचा विचार करून लॉकडाउन वाढवले म्हणून जनता सुरक्षित होऊ शकत नाही तर त्यासोबत असणाऱ्या इतर आर्थिक बाबींचा विचार शासनाने करणे आवश्यक आहे असे न झाल्यास शासन प्रतिमा किती मलिन होऊ शकते याचा विचार महाराष्ट्र शासनाने करावा असे देखील निवेदनात नमूद करण्यात आले आहे.निवेदनावर आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल नेता नंदू भाऊ गट्टूवार यांची स्वाक्षरी आहे