गवळी समाजामार्फत एक हात मदतीचा

24

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.25मे):-: कोल्हापूर मधील गवळी समाज व युवा संघटनेमार्फत दिलीप गवळी सर यांच्या मार्गदर्शनाखाली रोगप्रतिकारक काढाचे वाटप करण्यात आले.कोल्हापुरातील अनेक ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित असणाऱ्या पोलिस आधिकारी, कर्मचारी, होमगार्ड या सर्वांना दूध हळद काढा गवळी समाजाकडून देण्यात आला. यावेळी दिलीप गवळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ही सेवा नसून कर्तव्य आहे. पोलीस रात्रंदिवस आपल्या स्वतःचा व कुटुंबियांचा विचार न करता बंदोबस्तासाठी तैनात असतात.

त्यावेळी आमच्या सारख्या समाजसेवकांनी व अनेक समाजाच्या संघटनेने एकत्रित येऊन असे उपक्रम राबवणे गरजेचे आहे.
यावेळी देवेंद्र गवळी, दिलीप गवळी, युवराज गवळी, उदय डाकवे, अमोल गवळी,राहुल चीले, वैभव चिले, सुमित गवळी, सचिन महाडिक, संतोष महाडिक, महेश देसाई, स्वप्नील दळवी, आनंद पोवार, समर्थ गवळी, संतोष गवळी आदी उपस्थित होते.