मलकापूर उपजिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तपेढी सुरू करण्यात यावी या करिता उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

24

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

मलकापूर(दि.25मे):-धर्मवीर शिवसेना आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र धर्मवीर आखाडा अध्यक्ष श्री कुणाल संजय गायकवाड यांच्या हस्ते मलकापूर उपजिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तपेढी सुरू करण्यात यावी या करिता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.सोमवारी धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र धर्मवीर आखाडा अध्यक्ष श्री कुणाल संजय गायकवाड यांच्या कडे मलकापूर येथील विविध संघटनेचे तसेच समिती प्रमुख मलकापूर येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील बंद स्वरूपात असलेली रक्तपेढीसुरू व्हावी या करिता निवेदन घेऊन आले.

त्याची विशेष दाखल घेत कुणाल संजुभाऊ गायकवाड यांनी त्यांच्या सोबत जाऊन जिल्हाधिकारी यांना या बद्दल माहिती दिली आणि लवकरात लवकर मलकापूर येथिल रक्तपेढी सुरू करण्यात यावी अशी विनंती केली आणि त्या संदर्भातील निवेदन सुद्धा दिले.या वेळी कुणालभाऊ संजय गायकवाड यांच्या सह मलकापूर येथील श्रीकृष्ण तायडे,अमोल टप, दीपक कपले, शुभम सोनुने,मनोज यादव,विवेक राजापुरे, प्रांजली धोरण, दीपाली सोनुने,सचिन भन्साली, सुरज मेहसरे,राहुल सपकाळ, मोहन पर्हाड, अनुप श्रीवास्तव, ज्ञानेश्वर खांडवे आणि विविध संघटनेचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.