मांडवा येथे लसीकरण शिबिर संपन्न

30

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.28मे):-तालुक्यातील मांडवा येथे सरपंच सौ.अल्का ढोले,उपसरपंच विजय राठोड, व सचिव मंगेश देशमुख आणि सौ.शालिनी धाड,सौ.कमल राठोड,सौ. कविता आडे, सौ.संगिता गजभार,गोपाल मंदाडे, सौ.जयश्री आबाळे, सौ.आरती पुलाते ह्या ग्रामपंचायत सदस्यांच्या पुढाकाराने कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन दि.२९ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आले होते.

कोविड प्रतिबंधात्मक लस गौळ आरोग्य केंद्र येथे मिळते . परंतु त्या केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि मांडवा पासून आरोग्य केंद्रांचे अंतर जास्त असल्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक लस मांडवा येथे आज ४५ वर्षावरील ३० नागरिकांना लसीकरण
करण्यात आले.

यावेळी पो.पा.दत्तराव पुलाते, सचिव मंगेश देशमुख, उपसरपंच विजय राठोड, रमेश ढोले,डॉ. किरण वाठोरे,आरोग्य सेवक विनोद राठोड, आरोग्य सेविका अर्चना लोधी,आरोग्य सेविका यामिनी मस्के,व आशासेविका दिक्षा ढोले ,आशासेविका देविका साखरे ,ग्रा.पं.कर्मचारी प्रदुम्न आबाळे तसेच इत्यादी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.