अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरीच साजरी करा-रिपाई चे शशिकांत जगताप

    38

    ✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

    नाशिक(दि.29मे):-येवला तालुक्यात व राज्यभरात कोरोनाचं सकटं मोठ्या प्रमाणात वाढत आहे शासनाने सामाजिक,धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध आणलेले आहेत 31 मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास नवीन पिढीला भविष्यात मार्गदर्शन करणारा आहेत अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील एक छोट्याश्या खेड्यामध्ये चोंढी या गावी झाला त्यांचा विवाह चादंवङ येथील मल्हारराव होळकर यांच्याशी वयाच्या अवघ्या ८ वर्षेच्या असतांना त्यांचा विवाह मल्हारराव होळकर यांच्याशी झाला…

    पतीच्या निधनानंतर त्यानी राजकारभार हाती घेतला न्यायदानासाठी त्यानी आपले सर्वस्व पणाला लावून समाजाला न्याय देण्याचा काम केलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या धनगर समाज्याच्या आराध्य दैवत आहेत या जयंतीच्या दरम्यान आपल्या घरावर शक्य होईल तर पिवळे झेंडे लावावे पोलीस, डॉक्टर,आरोग्य कर्मचारी आदी कोरोना योध्याचे स्वागत करावे व धनगर समाजातील मेंढपाळ बांधवांना कोरोना लसी संबंधित जनजागृती करावी व सर्वांनी मास्क सॅनिटीजर चा वापर करून व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे व प्रशासन वारंवार सूचना देत असते त्यांचे नियमित पालन करून प्रशासनालाा सहकार्य करावे असे आवाहन शशिकांत जगताप यांनी केले आहे…