कोबिंग आपरेशन पार्ट 3

    51

    ?खामगाव पोलिस ऊपविभागाची कार्यवाही

    ✒️खामगाव प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

    खामगाव(दि.1जून):-सोन्याची नाणि कमी किमतीत विकण्याचा प्रयत्न करणार्या दधम परिसरात कोंबिग आँपरेशन चालवुन आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली. जिल्हा पोलिस अधिषक अरंविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक हेमराजसिंग राजपुत,ऊपविभागिय अधिकारी अमोल कोळी,ठाणेदार सुनिल अंबुलकर,संतोष टाले,प्रविण तळी,गोकुळ सुर्यवंशी,सपोनि गोंदके,गौतम ईंगळे,निलेश सरदार,पोऊपनि गौरव सराग,राहुल कातकाडे,ईश्वर सोळंके,पळसपगार,नितीन ईंगाहे,ब्राम्हणे,हरिविजय बोबडे यांनी ही कार्यवाही केली.

    सोन्याची नाणी कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवुन फिर्यादी हनुमान महादेव गिरी वय 24रा.माळशेलु जि.हिंगोली व त्याचा मित्र याला दि.29/05/2021ला शिर्ला नेमाने येथे बोलाविले. ते फिर्यादी पोहचल्यानंतर तेथे दबा धरुन बसलेले 10ते12 आरोपींनी फिर्यादीकडिल 25000₹ चा ऐवज लुटुन पळ काढला त्यानंतर या टोळीतील काहिंनी फिर्यादीला फोनद्वारे संपर्क करुन नकली सोन्याचे नाण्याचे अमिष देत बोलाविले त्यावेळी फिर्यादीने पोलिसांशी संपर्क केला अप्पर पोलिस अधिक्षक हेमराजसिंग राजपुत यांचे नेत्रुत्वात 64अधिकारी व कर्मचारींनी दधम,हिवरखेड शिर्ला डँम परिसरात कोंबिंग आँपरेशन राबविले,या दरम्यान आरोपींनकडुन मोटारसायकल क्र MH28-BD-8845सह तलवार,सुरा,चाकु,लाकडी दांडा,मोबाईल फोन असा 90000₹ जप्त करण्यात आला.

    यामध्ये पाच आरोपिंना1)महेश बाळु मोहिते2)दिलीप शेषराव चव्हाण3)क्रुष्णा पुंडलिक चव्हाण4)बळिराम पुंडलिक चव्हाण सर्व रा.दधम5) सतिष पवन पवार रा जयरामगडअटक करण्यात आली.सदर आरोपी यांचेवर राज्यभरातील विविध पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत.मागिल काळात अंत्रज, हिवरखेड पोरज भागातही कोंबिंग आँपरेशन राबवुन लाखो रुपये नगदी व स्त्रासह अनेक आरोपींना अटक करण्यात करण्यात आली होती. असेच कोंबिंग आपरेशनच्या घर्तीवर विनानंबरच्या सुसाट धावणार्या रेती गौणखनिजाच्या वाहनावरही कार्यवाही करण्यात यावी अशी चर्चाही नागरिकांमधुन होत आहे