शिवस्वराज्य दिन पंचायत समिती शेगांव मध्ये उत्साहात साजरा

27

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

शेगाव(दि.6जून):– महाराष्ट्राच्या जनतेला एका चैत्यन्य सूत्रात बांधून महाराष्ट्राचे सत्व आणि स्वत्व जोपासणाऱ्या राजकीय इतिहासाची पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. दीर्घकाळ परकीयांची राजवट आणि अनागोंदी अनुभवणाऱ्या महाराष्ट्राच्या रयतेला स्वातंत्र्य आणि सुबत्ता मिळवून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला होता. हा सुवर्ण दिवस राज्यशासनाने शिवस्वराज्य दिन म्हणून संपूर्ण राज्यात साजरा करण्याचे ठरवले. आज शेगांव पंचायत समितीच्या प्रांगणात शिवशक राजदंड गुढी उभारून जनतेला शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.या वेळी पंचायत समिती मध्ये वृक्ष रोपण सुध्दा करण्यात आले..या वेळी पं स सभापती शारदाताई पाटील पं स सदस्य विठ्ठल सोनटक्के राजूभाऊ देवचे निळकंठभाऊ पाटील पांडुरंगभाऊ सावरकर सुखदेवराव सोनोने ,गटविकास अधिकारी देशमुख साहेब व पंचायत समिती कर्मचारी उपस्थित होते..