मेहकर पंचायत समितीच्या प्रांगणात शिवस्वराज्यदिन

33

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

मेहकर(दि.6जून):-महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील सुवर्णसोहळ्याचा साक्षीदार असलेला शिवराज्याभिषेक दिन आज मेहकर पंचायत समितीच्या प्रांगणात शिवस्वराज्यदिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी, ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ खासदार श्री.प्रतापरावजी जाधव व आमदार डॉ.संजय रायमुलकर यांच्या हस्ते उभारण्यात आली. याचसोबत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मंगलमय दिवस म्हणजे ६ जून १६७४. याच दिनी शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला आणि राजे ‘छत्रपती’ झाले. आजपासून दरवर्षी ६ जून हा दिवस शिवस्वराज्यदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.व यावेळी खासदार श्री.प्रतापरावजी जाधव,आमदार डॉ.संजयजी रायमुलकर, सभापती सौ.निता देशमुख, गटविकास अधिकारी श्री.पवार,गट शिक्षण अधिकारी श्री. वानखेडे माजी जि.प.सदस्य दिलीप देशमुख उपस्थित होते.