महिला पोलीस कर्मचारी यांची छेडछाड केल्याची वरिष्ठ पोलिसांनी दिली कबुली- गुन्हा दाखल

22

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

अकोले(दि.6जून):- अकोले पोलीस स्टेशन मध्ये महिलावर अत्याचार झाल्याची घटना ताजी असता ना राजुर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस हेडकॉन्स्टेब भाऊसाहेब आघाव यांनी रात्रीच्या वेळी कामावर असलेल्या रात्रीच्या महिला कॉन्स्टेबल वर मैत्री करण्याचा दबाव आणून त्या महिला कर्मचाऱ्या चा हात धरुन मिठी मारली घटना घडली असून संबंधित माहिती जिल्हा पोलीस कार्यालय येथे जाऊन सांगितली व फिर्याद दाखल करून त्याप्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब आघाव यांच्यावर भादवि कलम 354 अ कलम 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रमाणे राजुर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक 30 मे रोजी रात्री कामावर असताना महिला पोलीस कर्मचारी यांच्या बरोबर ड्युटीवर असलेले भाऊसाहेब आघाव यांनी माझ्याशी मैत्री कर असे म्हणून त्या महिला कर्मचारी यांचा हात ओढून जवळ घेऊन मिठी मारली या घटनेनंतर लगेच महिलेने वरिष्ठाकडे तक्रार केली तक्रारीनंतर आरोपी आघाव यांनी महिलेची लेखी माफी मागितली यापुढे असे करणार नाही महिलेने बदलीची मागणी करून काही काळ प्रकरण थांबले होते पुन्हा एक तारखेला या आरोपीने महिलेची छेडछाड केल्याने महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी यांनी तातडीने नगर येथे जाऊन वरिष्ठाकडे तक्रार करून गुंजा नोंदवण्याची मागणी केली त्याप्रमाणे शनिवारी रात्री आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे साहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सहाय्यक फौजदार नितीन खैरनार तपास करत आहे सदर आरोपी भाऊसाहेब आघाव रजेवर असून त्याला लवकरच अटक करून न्यायालयासमोर उभे केले जाणार असल्याची पोलीस सूत्रांनी सांगितले.

सदर महिला 2015 पासून राजुर पोलीस स्टेशनला काम करत असून अतिशय मितभाषी ही महिला प्रामाणिक असल्याचे कर्मचारी सांगतात महिलेवर झालेल्या अन्यायाबाबत महिला संघटना आक्रमक झाल्या असून लवकर जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटून निवेदन देण्याची माहिती भाजप महिला जिल्हाध्यक्ष सौ सोनल ताई नाईकवाडी दिली आदिवासी भागात पोलिस संरक्षण देण्याऐवजी महिलावर अत्याचार करत असतील तर जिल्ह्यात व राज्यात आंदोलन करून जाब विचारू राजूर प्रकरणात तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आह