मांडवा येथील स्मशानभूमी सिमेंट शेडच्या कामास सुरुवात

36

🔹मांडवा येथील स्मशानभूमीचा लोकसहभागातून विकास

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.6जून):- जिल्हा परिषद सदस्य भोलेनाथ कांबळे यांच्या (सन २०१९-२०) निधीतून जनसुविधा योजनेतून पुसद तालुक्यातील मांडवा येथील स्मशानभूमी करिता अंत्यविधी ईमारत ५ लाख रुपयांची मंजूर करण्यात आली .

हे काम सुरू होण्यापूर्वी दि.४ जुन रोजी मांडवा येथील ग्रामपंचायतीने व तेथील नागरिकांच्या लोकसहभागातून विकास कामे करण्याचे नियोजन केले यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने स्मशानभूमी परिसराचा जेसीबीने साफसफाई करण्यात आली .

तसेच उपसरपंच विजय राठोड यांनी स्मशानभूमी करिता एक एलईडी फोकस लाईट ,अंकुश फुलसींग राठोड यांच्याकडून कै.बाजूबाई फुलसिंग राठोड (आई)स्मृतीप्रित्यर्थ प्रवेशद्वार, प्रवेशद्वारा करिता दोन कॉलम रमेश राठोड ठेकेदार यांच्याकडून , बजरंग पुलाते यांच्याकडून एक सिमेंट बेंच, कैलास राठोड यांच्याकडून दहा झाडे, विनोद टेकाळे यांच्याकडून दहा झाडे ,शिवाजी चिरमाडे यांच्याकडून एक सिमेंट बेंच,नागु टेकाळे यांच्याकडून 1 सिमेंट बेंच, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मंडळ मांडवा यांच्याकडून एक सिमेंट बेंच,कै.आत्माराम चाफला आडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिलीप आडे यांच्याकडून एक सिमेंट बेंच ,अंकुश घावस यांच्याकडून एक ट्रॅक्टर काळी माती, महादेव बोरकुट यांच्याकडून एक ट्रॅक्टर काळी माती असे जाहीर करण्यात आले .

या ५० झाडांना पाणी पुरवठा होईल असे ठिबक सिंचन समर्थ सेंद्रिय भाजीपाला केंद्र पुसदचे संचालक दत्ता शामसुंदर यांच्याकडून देण्यात आले.

आज दि.६ जुन रोजी मांडवा येथील स्मशानभूमीच्या अंत्यविधी सिमेंट इमारतीच्या कामास सुरुवात झाली. यावेळी सरपंच अलका ढोले ,उपसरपंच विजय राठोड ,पोलीस पाटील दतराव पुलाते, ग्रा.पं. सदस्य कमल राठोड ,गोपाल मंदाडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुधाकर चव्हाण,गोविंदा घुक्से, देविदास वानखेडे,तुकाराम चव्हाण,दगडूजी ढोले, महादेव डोळस,शिवाजी चिरमाडे,नागु टेकाळे,साहेबराव ढोले, पंडित पुलाते,रमेश राठोड ठेकेदार, सुदाम ढोले, रमेश ढोले, कैलास राठोड, डॉ.हरिभाऊ धाड, जयाजी आबाळे, बाळु धाड, विठ्ठल आडे, सुभाष वानखेडे, दिलीप आडे,बजरंग पुलाते, गजानन आबाळे,बाळु पुलाते, बजरंग राठोड प्रदुम्न आबाळे, बाळासाहेब ढोले तसेच इत्यादी नागरिक उपस्थित होते.