अंतोद्यय कार्ड द्या,अन्यथा ऊपोषण

42

✒️शेगाव प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

शेगाव(दि.7जून):- तालुक्यातील दिव्यांग घटकाला न्याय देण्यासाठी शेगाव तहसिलदार यांना भारतिय जनता पार्टी दिव्यांग सेल यांचे वतिने निवेदन सादर करत १७ अर्ज दिले आहेत त्यांना दोन आठवड्यात अंतद्योय योजने अंर्तगत रेशन कार्ड देण्यात यावे अन्यथा ऊपोषण करण्यात येईल.

शेगाव तहसिल अंर्तगत येत असलेल्या दिव्यांगाना होत असलेली ऊपाससमार पासुन वाचविण्यासाठी या दिव्यांगांना प्राधान्याने अंतोद्यय योजने मध्ये समावेश करीत त्यांना विनाविलंब धान्य ऊपलब्द करुन देण्यासाठी भाजपा दिव्यांग आधाडी शेगाव च्या वतिने नगराध्यक्ष सौ. शंकूतलाताई बुच, भाजपानेते श्री पांडुरंगदादा बुच, नगरसेवक श्री कमलाकर चव्हाण, गजानन जवंजाळ, शहर अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साखरे, तालुका अध्यक्ष श्री विजय भालतिलक, भा. ज. पा. दिव्यांग सेलजिल्हाध्यक्ष कु स्नेहा ओवे, शहर अध्यक्ष Adv. प्रविण पल्हाडे, तालुका अध्यक्ष प्रकाश रावणकर, संतोष बडोलिया, सचिन वराडे, विजय राऊत, हरीश चवले, केशव वाढोकार, नरेंद्र खेरडे, पुरुषोत्तम बोरसे, संतोष कान्हेरकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.