छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक दिना निमित्त निसर्गसाथी फाउंडेशन चे जंगल पदभ्रमण

35

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.7जून):- (७/६) निसर्गसाथी तर्फे आयोजित शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जंगल पदभ्रमण कार्यक्रमा चे यशस्वी आयोजन करण्यात आले .यात सहभागी सर्व भ्रमणवीरांना नीलगाय blue bull ,स्वर्ग नाचन paradise flycatcher, राखाडी धनेश Grey Hornbill ,नवरंग Indian pitta ,भारद्वाज Grater Cokal, छोटी अंगारक Small Minivet ,गोसावी Red bug ,कोळी spider पक्षी हिवाळ्यात स्थलांतर करून येतात त्याच प्रमाणे काही पक्षी उन्हाळ्यात स्थलांतर करून आपल्या भागात येतात , इथे घरटी करून पिलांना घेऊन परत जातात.

या उन्हाळी प्रवासी पक्षाची घरटी पाहण्याची संधी सुध्दा सर्वांना पदभ्रमण दरम्यान मिळाली आपल्या भागात गोसावी म्हणून ओळख असलेलं Red bug हे कीटक पाहून अनेकांना आपल्या बालपणाची आठवण झाली कु अंजोर कडू या बालविद्यार्थीनीने macromamata हिरवा शिकारी कोळी या दुर्मिळ जाती कडे सर्वांचे लक्षवेघले .तसेच जंगलातील झाडांची माहिती सुध्दा घेऊन त्यांचे निरीक्षण करण्यात आले . या पदभ्रमण कार्यक्रमात प्रविण कडू ,जितेंद्र केदार ,गुणवंत ठाकरे ,नियजुद्दीन सिद्दीकी मनोज बोकडे, राकेश झाडे ,परीक्षित ढगे ,प्रगती बोकडे ,भावना चाफले ,अंजोर कडू इत्यादी सहभागी झाले होते