अखिल भारतीय मराठा महासंघ खामगाव च्या वतीने राज्याभिषेक दिन झाला उत्साहात साजरा

34

✒️प्रतिनिधी खामगाव(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.7जून):-छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम खामगाव येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन अखिल भारतीय मराठा महासंघाचे वतीने साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धअभिषेक करून पूजन व समाजबांधवांच्या वतीने माल्यार्पण करण्यात आले तसेच यावेळी परिसरात वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले. सदर कार्यक्रम हा कोव्हिडं नियमाचे पालन करीत करण्यात आला सर्वप्रथम मराठा महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ माने, रमाकांतजी गलांडे, यांनी पूजन केले.

त्यानंतर महासंघाचे जिल्हा सरचिटणीस नगरसेवक व प्रेस कल्ब अध्यक्ष किशोरअप्पा भोसले व मा. शहराध्यक्ष संजय शिनगारे, शहर अध्यक्ष राजेश मुळीक, नगरसेवक प्रवीण कदम नगरसेवक हिरालाल बोर्डे महिला महासंघ जिल्हाध्यक्ष श्रीमती अनिता ताई तनपुरे यांनी माल्यार्पण करून पूजन केले व छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास राज्याभिषेकदिनी अभिवादन केले या प्रसंगी मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ बोन्द्रे, दिगंबरभाऊ गलांडे, चंद्रकांतजी रेठेकर, कल्याणभाऊ गलांडे विकासभाऊ चव्हाण, महेंद्र पाठक, नरेंद्र मावळे, तानाजी राऊत, संभाजी तनपुरे, सुभाष शेळके, शशी वखरे, देविदास सरोदे, संजय मोहिते, महादेव सुकाळे सर, सुनिल भुसारे, गजानन केवारे, गजानन घाडगे, भानुदास पवार, दीपक केवारे, संजय शिंदे, राजू बोरकर, संतोष येवले, किसना राऊत, विशाल घोडके, निखिल घाडगे, आकाश खरपाडे, सागर मोरे, सुनिल सातपुते, सुरज साबळे, अनिकेत मुळीक, निखिल घाडगे, यांच्यासह महिला भगिनी व सर्व शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते