कुंडलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णवाहीका लोकार्पण व वृक्षारोपण

32

✒️अशोक हाके(बिलोली तालुका प्रतिनिधी)मो.नं.9970631332

बिलोली(दि.7जून):-तालुक्यातील कुंडलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज दिनांक ७ जुन रोजी रूग्णवाहीका लोकार्पण व वृक्षा रोपण आरळीचे जि.प.सदस्य लक्ष्मणराव ठकरवाड व न.पा.चे नगराध्यक्षा सुरेखा जिठावार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी गणपत वाडेकर,गटविकास अधिकारी तोटरे,बि.ओ.शेळके,सोसायटीचे चेअरमन साईनाथ उत्तरवार, नगराध्यक्षा प्रतिनिधी नरेद्र जिठावार,न.पा.चे उपाध्यक्ष शैलेश -याकावार,नगरसेवक सुरेश कोंडावार,सचिन कोटलावार,वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी सातमवाड,डॉ.विनोद माहुरे,डॉ.नरेश बोधनकर,डॉ.हणमंत लखमपूरे व आरोग्य अधिकारी,सेवक,सेविका,अाशा वर्कर आदी उपस्थित होते.