खेर्ङा अट्राॅसिटी प्रकरणी भिमप्रहार मोफत केस लढणार – अॅङ. विष्णु ढोले

30

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

परभणी(दि.७जुन):-पाथरी तालुक्यातील खेर्ङा या गावात जातीयवादी गावगुंङाने गावात हैदोस घातला असुन मागील दिङ महिन्यात दोन वेळा बौध्द समाजातील व्यक्तीला व महिलांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पाथरी पोलीस स्टेशन येथे अट्राॅसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंद झाला असुन ही वाढत चाललेली जातीय अत्याचार प्रकरणे रोखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे. खेर्ङा येथील अट्राॅसीटी प्रकरण भिमप्रहार आरोपीना शिक्षा होईपर्यंत मोफत केस लढणार अशी घोषणा भिमप्रहार चे जिल्हा महासचिव अॅङ. विष्णु ढोले यानी खेर्ङा येथे गावात भेट देऊन केली.

भिमप्रहार च्या संपुर्ण टीमने काल दि. ७जुन रोजी खेर्ङा येथे भेट दिली. याप्रसंगी भिमप्रहार चे संस्थापक अध्यक्ष प्रा. ङाॅ.प्रविण कनकुटे, जिल्हाध्यक्ष विश्वजीत वाघमारे, वंचित बहुजन महिला आघाडीच्या वंदनाताई जोंधळे, आनंद भदर्गे, जयश्री पुंङगे, मनेरे ताई, बापु धापसे, राहुल जाधव, गौतम जमदाङे, गणेश साठे, जानकीराम मगर, अमोल सुतार, विकास धापसे, विकी कांबळे, दिनेश धापसे, यांच्या सह शेकडो युवकानी गावात भेट दिली