फिरस्ती – मरण स्वस्त होत आहे

32

क्षितिजाच्या ढगातून नव्या सूर्याचा उदय होतो तर संध्याकाळच्या कमानीवर तो गडप होतो.दिवस रात्रीचं कालचक्र अव्याहातपणे सुरू असतं.प्रत्येकांना जीवनाची हमकास हमी देणारा सूर्य पृथ्वीच्या जीवनसृष्टीचा खरा निर्माता आहे.पृथ्वीला सूर्यामूळेच अर्थ प्राप्त झाला आहे.

पृथ्वीवरील सर्वांत बुध्दीमान प्राणी हा माणूस आहे.स्वतःच्या कवेत नसणाऱ्या कल्पनेतून भविष्यातील मानवाला सुखी करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत असतो.विज्ञान तंत्रज्ञानाच्या बळावर माणसाने आकाशातील ग्रहगोलावर मोठे संशोधन केले आहे.तसे तो नव्या पृथ्वीच्या शोधात सातत्याने काम करत आहे.हा माणूस अब्जोदूर जाऊन पोहचला असला तरी घराजवळच्या माणसाना कमी लेखतो आहे. माणसांमध्ये भेदाभेद करतो आहे.वर्गवाद वंशवाद,धर्मवाद ,जातीवाद,प्रांतवाद,भाषावाद,अशा अनेक कारणाने माणूस माणसाचे शोषण करत आहे.कोविड १९ चा रोगाणू विकृत माणसाच्या डोक्यातून निघालेला नवा विकृतसुक्ष्मजीव आहे.या रोगांणूने माणसाचे मरण स्वस्त केलं आहे.

कोरोना विषाणूच्या महामारीने सारे क्षेत्र बंदीवासात गेले आहेत.काही राजकीय नेतृत्वाने स्वातंत्र्यात विहार करण्याऱ्या माणसाला अंधाऱ्या गुहेत ढकलले आहे.भारतात दुसऱ्या लाटेने मरण स्वस्त केलं असून अमानवीय कौर्यभरी राजसत्ता मूत्युचा योग्य आकडा देऊ शकत नाही.लॉकडाऊनच्या निर्णयाने देशात अराजकता निर्माण केली होती.आज देशातील अर्थव्यवस्था भांडवलदारांच्या घरी पाणी भरत आहे.९९%जनता देशाच्या अर्थव्यवस्थेतून बाहेर पडला असून भांडवलदार व श्रीमंत लोकांचे फायदे झाले आहेत.लॉकडाऊनने जे गंभीर परिणाम लोकांना भाेगावे लागले ते आपण विसरू शकत नाही.या जखमा भळभळ वाहात आहेत. लसीकरणाचे नियोजन गडगडल्याने लस घेण्याच्या वेळेचा कालावधी वाढविण्यात आला आहे.

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं लोकाचं मरण स्वस्त केलं असून सारी आरोग्य यंत्रणा दबावात आली आहे.अनेक खाजगी हॉस्पिटलने लाखो रूपयांचे बील घेऊन रुग्णाचे व नातेवाईकांचे शोषण केले आहे.वेळेवर योग्य बेड,ऑक्सिजन , औषधोपचार , इंजेक्शन इत्यादी न मिळाल्याने रुग्णाचे हकनाक बळी गेले आहेत.

देशातील नेतृत्वशून्य सरकार स्वतःची पत सुधारण्याचा प्रयत्न करत आहे पण मृत्युचा खरा आकडा काढण्यात सपशेल फेल ठरले आहे .लसीकरणाचे नियोजन गडगडल्याने कोविन अँपवरील नियंत्रण कमजोर झाले आहे.देशातील लोकांना आश्वासनाची खैरात देऊन सत्यता लपवली जात आहे.जर लवकरात लवकर लसीकरण झाले नाही तर ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये तीसरी लाट आली तर भारतीय लोकांची किती हानी होईल हे सांगता येत नाही.

आतातरी देशनेतृत्वाने अंहकारवृत्ती सोडून वास्तविकता समजून घ्यावी .देशाचा आरोग्यविषयक ,आर्थिक, सामाजिक,राजकिय ढाचा वाचवायचा असेल तर सर्व अंगाने विचार व्हावा.एकखांभी नेतृत्व देशाला वाचवू शकत नाही. दुसऱ्या लाटेत उत्तर प्रदेश, बिहार व काही राज्यात ज्याप्रमाणे शव नदीत प्रवाहित करण्यात आले अशी अवस्था पुन्हा निर्माण होवू नये म्हणून उपाययोजना करावी .देशाचा आर्थिक कणा तुटला असून या आणीबाणीत नको तिथे पैसा खर्च न करता माणसाच्या जीवनासाठी खर्च करावा.गरीब लोकांचे जे हाल होत आहेत यांच्याकडे लक्ष द्यावे नाहीतर हेच माणसे तुमची नशा उतरल्याशिवाय राहणार नाही.
आज जरी तुम्ही सुरक्षित असले तरी ही महामारी तुमच्या घरापर्यंत येणार नाही यांच्या भ्रमात राहू नका .हा विषाणू तुमचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही.

देशाला प्रेताचे थडगे बनविण्यापासून रोखने सरकारची जबाबदारी आहे.ते आपल्या जबाबदारीपासून हात झटकू शकत नाही. भारतीय लोकांना जगण्याने जसे छळले तसे मरण्यानेही छळले आहे.ज्याच्या घरचे या महामारत मरण पावले त्याचे दुःख आभाळाएवढे आहे.

कुणी आई,बाबा,भाऊ,पती,पत्नी,मुलगा,मुलगी असे सारेच गमावले आहे. त्याचे जीवन उध्दवस्त झाले आहेत.मरणाने इतकी वाईट अवस्था कधीही केली नाही.दवाखाने ,रस्ते ,चौक, समशान ,अशा साऱ्या ठिकाण मृत्युचे तांडव पाहले आहेत.

डोळ्यादेखत मृत्यु झालेले आहेत.पैसे असून योग्य उपचार मिळू शकले नाही.सारीकडे रडण्याचे अश्रू दाटून येत आहे.जगण्याच्या धडपडीत सारे गमावून बसले आहे.सारीकडे मरण स्वस्त होत आहे .राजा मात्र नकाश्रू तेवढे ढाळत आहे.अशा खोट्या अश्रू पासून सावध व्हा ..! लढाई जिंकायची आहे हा मनी ध्यास घ्या .देशाला वाचवायच आहे . यासाठी आपल्या लोकांना लढाईसाठी तयार करा हाच योग्य मार्ग आहे.दुसरा माहीत नाही.तूर्तास थांबतो….!

“अंधारलेल्या वाटांचा
प्रकाश बंदिस्त झाला आहे.
देशाला वाचविणाऱ्या तरूणाईचा
आवाज दाबल्या जात आहे.
माणसाला मारणाऱ्या श्वापदाची
जमात निर्माण झाली आहे.
पृथ्वीवरील सुंदर माणसाचे
मरण स्वस्त होत आहे….!”

✒️लेखक:-संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००