चव्हाणवाडी (टे) येथे राष्ट्रवादी काँग्रेसपक्षचा २२ वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा

29

✒️चव्हाणवाडी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चव्हाणवाडी(दि.10जून):- येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दिन राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे माढा तालुका उपाअध्यक्ष संजय मिस्कीन यांच्या वतीने पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून ज्यांनी सेवा केली त्यामध्ये आशा सेविका सुतार मॅडम, अंगणवाडी सेविका पूजा खरात, छाया साळुंके, मदतनीस कांबळे मॅडम व खरात मॅडम त्याचबरोबर कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून आमीर काजी, अस्लम काझी, नागेश शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी फळांच्या झाडांचे केशर आंबा व तैवान पेरू या रोपांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.

तसेच, आई-बाबा फाउंडेशन या संस्थेने केलेल्या सामाजिक कार्याचे दखल घेऊन पक्षाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष नवनाथ नांगरे गुरुजी व सचिव महेश खरात वकील यांचा सन्मान करण्यात आला. चव्हाणवाडी गावातील युवक संग्राम सलगर यांनी वयाच्या अठराव्या वर्षी संयुक्त राष्ट्र हायकमिशनर निर्वासित समिती ( नियुक्ती देश- दक्षिण आफ्रिका ), आंतरराष्ट्रीय युवा प्रतिनिधी भारत, संयुक्त राष्ट्र, अशाप्रकारे एकूण 700 पेक्षा जास्त प्रमाणपत्र व सन्मानपत्र मिळवल्याबद्दल यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी चव्हाणवाडी चे सरपंच सुनील मिस्कीन, उपसरपंच बाळू मोठे, चव्हाणवाडी चे नेते अशोक मिस्कीन, अर्जुन सलगर, भागवत खडके, कैलास चव्‍हाण, सचिन चव्हाण, अनील खडके, महावीर नांगरे, सिद्धेश्वर सलगर, तुकाराम इंदलकर, अनिल चव्हाण, चव्हाणवाडी चे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते प्रवीण नांगरे, महेश पवार, संग्राम चव्हाण, भाऊ इंदलकर, विशाल भोसले, बाळासाहेब नांगरे, आसिफ काझी, जावेद काझी, आबा मिस्कीन, अमोल नागणे, विजय कदम, विक्रम मिस्कीन, शुभम नांगरे, धनंजय भोसले पत्रकार, सोमनाथ मिस्कीन, पवन चव्हाण, विजय मिस्किन, आदित्य मिस्कीन, यशराज मिस्कीन, शंभू चव्हाण, इत्यादी उपस्थित होते.