झायलो कार एस. टी.बसला आढळली

30

✒️सचिन महाजन(प्रतिनिधी हिंगणघाट,वर्धा)मो:-9765486350

हिंगणघाट(दि.10जून):-राष्ट्रीय महामार्गावरुन वड़की येथे जाण्यास निघालेल्या झायलो कारचे चालकास झोपेची डुलकी आल्याने कार अनियंत्रित होऊन डिवायडरवर पलीकडे जाऊन एसटी बसवर जावून आदळल्याने घडलेल्या अपघातात झायलो कारची मोठी तोड़फोड़ झाल्याची घटना आज सकाळी ११.३० वाजता दारोडा शिवारात घडली.सदर अपघातात एस टी महामंडळाची राळेगांव येथून हिंगणघाट जाण्यास निघलेली बससुद्धा क्षतिग्रस्त झाली,परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी अपघाताचे वेळी झाली नाही.खापा(नागपुर)येथून वड़की येथे जाण्यासाठी चालक झायलो राजेंद्र कांबले हा खापा येथून निघाला,सोबत कारमधे संजीवन गनावरसिंग यांचेसह दोघेही प्रवासाला निघाले होते.

राष्ट्रीय महामार्गावरुन दारोडा शिवारात आले असता झायलो चालक राजेंद्र कांबळे यास झोपेची डुलकी आली,यावेळी कार अनियंत्रित होऊन डिवाइडर पार करुन रस्त्याचे दुसऱ्या बाजूस पुढे गेली.याचवेळी राळेगांव येथून विरुद्ध दिशेने हिंगणघाट येथे निघालेली एस टी बस क्र.एमएच ०७ सी-९०८३ सहा प्रवाशासह भरधाव वेगाने तेथून जात होती.

अनपेक्षितरित्या झायलो कार मधेच आल्याने एसटी चालक इमरान खान अफसरखान याने प्रसंगावधान साधुन एसटी बस जागीच थांबविली,त्यामुळे पुढील अनर्थ टळला.घटनेची माहिती मिळताच वडनेर पोलिसांनी घटनास्थळी पोचुन वाहतुक सुरळीत केली सदर प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मसराम,सोनपितळे तसेच पोलिस कर्मचारी अजय वानखेड़े,राहुल गिरडे,गणेश मेश्राम,प्रफुल चन्दनखेड़े इत्यादि करीत आहेत.