मा.आ.भीमसेन धोंडे यांच्या मागणीनुसार बी-बियाणाच्या विक्री नियंत्रणासाठी झाली पथकाची नियुक्ती

19

🔸शेतकऱ्यांनी मा.आ.धोंडे यांचे आभार मानून समाधान केले व्यक्त

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.10जून):-पाटोदा,शिरुर का. मतदारसंघातील बी-बियाणाची चढ्या भावाने होणारी विक्री तात्काळ बंद करणे बाबत तसेच महसूल व कृषी विभागाचे संयुक्त पथक नेमून कृषी दुकानात बी-बियाणाचे विक्री करणे बाबत दि.०९ जुन रोजी बीडचे उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांची भाजपा जेष्ठ नेते मा.आ.भीमसेन धोंडे यांनी भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यानुसार सदरील निवेदनाची मा.उपजिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन जिल्हा कृषिअधिकारी बीड यांना पत्राद्वारे सूचित करून कार्यवाही करण्याचे कळविले आहे.
सध्या खरीप हंगाम सुरू झालेला असून शेतकरी बी-बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी दुकानावर गेले असता चढ्या भावाने बियाणे विक्री केली जात आहे.

शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात असताना अशा प्रकारची पिळवणूक होत आहे.तसेच कुठल्याही कृषी दुकानावर बी-बियाणे,खते,औषधें याचे अधिकृत भावफलक लावलेले नाहीत.तरी संबधित कृषी दुकानावर प्रशासनाचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे निदर्शनात आले असून जिल्हा कृषी अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.मा.आ.भीमसेन धोंडे यांनी आष्टी,पाटोदा,शिरुर का. मतदारसंघातील काही गावांना भेटी दिल्या असता बहुसंख्य शेतकऱ्यांनी तक्रारी करत बी-बियाणे,खते व औषधें चढ्या भावाने विक्री केली जात असल्याचे बोलून दाखवले.

त्यामुळे आष्टी,पाटोदा,शिरुर का. मतदारसंघातील प्रत्येक कृषी दुकानावर महसूल व कृषी विभागाने आपले कर्मचारी नेमून शेकऱ्यांच्या उपस्थितीत बी-बियाणे,खते व औषधें शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार विक्री करावी.तसेच विशेष पिके कांदा,उडीद,मुग,तूर,सोयाबीन व इतर बी-बियाणांचे भाव फलक लावून शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यात यावेत अशी लेखी मागणी बीडचे उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांची भाजपा जेष्ठ नेते मा.आ.भीमसेन धोंडे यांनी भेट घेऊन निवेदनाद्वारे दि.०९ जुन रोजी मागणी केली होती.

त्यानुसार मा.आ.भीमसेन धोंडे यांच्या निवेदनाची मा.उपजिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन जिल्हा कृषिअधिकारी बीड यांना पत्राद्वारे सूचित करून मा.आ.भीमसेन धोंडे यांच्या निवेदनातील नमूद मुद्याबाबत चौकशी करून तात्काळ कार्यवाही करण्याबाबत कळविले आहे.मा.आ.भीमसेन धोंडे यांच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन संबंधितांना सूचित केल्याबद्दल आष्टी,पाटोदा,शिरुर का. मतदारसंघातील शेतकऱ्यांनी बीडचे उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे व भाजपचे जेष्ठ नेते मा.आ.भीमसेन धोंडे यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.