गंभीर जखमी गाढवाला जिवदान !

33

🔸निसर्ग साथी फाऊंडेशन चा पुढाकार

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.११जून):-हिंगणघाट शहरातील हरीओम सभागृहा समोर दि ९ ला सायंकाळी सहा चे सुमारास अज्ञात वाहनाचे धडकेत गाढव गंभीर जखमी झाले.ते रात्रभर जागीच व्हीवळत राहीले बिचारे ! शेवटी मुका प्राणी आणि ते दुर्लक्षित गाढवच ना! शुक्रवार ला सकाळी ८ चे सुमारास हरिओम सभागृहात पतंजली योग समितीचे योगवर्गातील योग साधकांना हे गाढव व्हिवळत असताना आढळले . त्यांनी त्याचेवर पशुचे डाक्टर करवी प्राथमीक उपचार केले व पतंजली योग समिती चे वसंत पाल यांनी जखमी गाढवासंबधीची कल्पना निसर्ग साथी चे प्रभाकर कोळसे यांना दिली.प्रभाकर कोळसे ना या संबंधांची सुचना मिळतात निसर्ग साथी फाऊंडेशन चे प्रविण कडु यांना दिल्यानंतर ते निसर्ग साथी राकेश झाडे ना सोबत घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

तेथे त्यांनी गाढवाला बघीतले तर याला पाणी पाजले ,गाढवावर प्रारंभीक उपचार केले होते च. मात्र गाढवाच्या पाठीवर वरुन ट्रक्टरचे चा गेल्याने गाढवाला उभे राहता येत नव्हते .गाढव जर तिथेच पडून राहीले तर गाढव अन्नपाणीविना मरण पावेल .मा्त्र कुठल्याही परिस्थितीत गाढवावर वैद्यकीय उपचार करुन गाढवाला बरे करण्याचा चंग प्रविण कडु यांनी मनी बाळगून वर्धा येथील पिपलस फार अनिमल चे आशिष गोस्वामी यांचेशी संपर्क साधला व जखमी गाढवाबद्दल माहीती दिली. आशिष गोस्वामी मी गाढवाला वर्धेच्या करुणाश्रमात गाढवाला घेउन येण्यासंबधी सुचवले.प्रवीण कडु,राकेश झाडे, आशिष भोयर यांनी गाढवाला प्रा निता पटेल यांचे सौजन्याने गाडी करुन वर्धेच्या करुणाश्रमात दाखल केले.

वर्धेच्या करुणाश्रमात दाखल करताच तेथील डॉ सचिन ढालकरी यांनी गाढवाची तपासणी करून त्यावर उपचार केले . गाढवाच्या पाठीवरून चाक गेल्याने स्पायनल कार्ड निकामी झाल्याने गाढवाला उभे राहता येत नाही.उपचारा अंती दोन दिवसात गाढव उभे राहिले तर ते निश्र्चितच जगणार असे डॉक्टरांनी सांगितले.शेवटी मुका प्राणी गाढव याची दखल हिंगणघाट शहरातील निसर्ग साथी फाऊंडेशन नी घेउन त्या मुक्या प्राण्याला वर्धा येथे करुणाश्रमात दाखल केले तो पर्यंत गाढव कुणाचे त्याचा मालक कोण काही थांगपत्ता लागला नाही.

गाढवाचा ओझे वाहण्यासाठी वापर करायचा आणी बेवारस सोडून द्यायचे शेवटी गाढवच ना ते गाढवाला हात लावणे सुद्धा विटाळ समजले जाते परीणामी जखमी गाढवाजवळ कुणी फिरकेना.एरवी ओझी वाहणारा गाढव आणी सांगकाम्या असलेल्या मनुष्य प्राण्याला सहज गाढवपणा या संज्ञेत बसवता येते आपल्याला कुणी गाढव म्हटले तर प्रचंड अपमान झाल्याची भावना निर्माण होते. एवढे गाढवाबद्दचे पुर्वग्रहदुषीत . मात्र हिंगणघाट शहरात पर्यावरणातील पशु, पक्षी ,वेली संवर्धनासाठी काम करणाऱ्या निसर्ग साथी फाऊंडेशन नी या जखमी गाढवाला उपचारासाठी करुणाश्रमात दाखल करुन गाढवाला जिवदान दिले या कामी निसर्ग साथी फाऊंडेशन चे प्रवीण कडु, प्रा निता पटेल, राकेश झाडे, आशिष भोयर, अभिजित डाखोरे, प्रभाकर कोळसे, पतंजली योग समिती चे वसंत पाल ,विनीत श्रीवास , योगेश सुंकटवार, डॉ नाखले यांचे सहकार्य लाभले.