दिव्यांगांचे नानांना निवेदन

30

✒️खामगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

खामगाव(दि.11जून):- दिव्यांग यांच्या मागण्या विषयी व पाठपुरावा करत मागण्या मान्य करुन घेण्यासाठी नेहमी पुढे असलेल्या विराट दिव्यांग फाऊन्डेशन च्या माध्यमातुन संत तुकाराम मंगल कार्यलय खामगाव येथे नाना पटोले काँग्रेस पक्षाध्यक्ष महा. राज्य यांना माजी आमदार दिलीपकुमार सानदा यांचे मार्फेत निवेदन देण्यात आले.

दिव्यांगांच्या प्रमुख मागण्यामध्ये ग्रामविकास विभागाच्या धर्तीवर नगरविकास विभाग मध्ये ही दिव्यांगांना २०० फुट जागा व्यवसायासाठी ऊपलब्द करुन देणे तसेच घरकुल देणे, समाज कल्याण विभागाकडुन दिडलाख मिळत असलेले बिज भांडवल ते पाचलाख रुपये करण्यात यावे.

राजस्थान राज्याच्या धर्तीवर राज्य सरकारने ही दिव्यांगांना स्विक्रुत सदस्य स्थानिक संस्थेमध्ये पदे देण्यात यावी, दिव्यांगाना घरपट्टी,पाणीपट्टी माफ करावी असे निवेदन मनोज नगरनाईक अध्यक्ष विराट दिव्यांग फाऊन्डेशन तसेच सा.दिव्यांग शक्ती व्यवस्थापक मधुकर पाटील यांनी दिले