कोरोणाने लागले अर्थव्यवस्थेला ग्रहण – डॉ. श्रीनिवास खांदेवाले

29

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.11जून):-स्थानिक रा. सु. बीडकर महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय आभासी चर्चासत्र हिंगणघाट (११/६) स्थानीक रा सु बिडकर महाविद्यालयात ‘ “कोविड १९ भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम व शासनाची भूमिका” या विषयावर राष्ट्रीय आभासी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रात मार्गदर्शक म्हणून डॉ. श्रीनिवास खांदेवाले जेष्ठ अर्थतज्ज्ञ नागपूर बोलताना म्हणाले की सद्य स्थितीत कोरोनाने आर्थिक व्यवस्थेला ग्रहण लागले असुन शंभर वर्षांनंतर महामारी बघीतलेली आहे.

परंतु इतकी भयंकर व विदारक महामारी आजपर्यंत बघीतलेली नाही आणि डॉ संदिप तुंडुरवार बिंझानी महाविद्यालय नागपूर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कोरोनामुळे निर्माण स्थितीत शासनाचे वर्तमान धोरण हे सर्व सामान्य लोकांना फायदेमंद नाहीतच .सदर चर्चासत्रासाठी प्राचार्या, डॉ. पुष्पा तायडे वर्धा आणि प्राचार्य डॉ. संजय धनवटे कारंजा घाडगे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होेते. चर्चासत्राच्या उदघाटक म्हणून डॉ. प्रा. उषाकिरण थुटे, अध्यक्षा ग्रामीण विकास संस्था हिंगणघाट, चर्चासत्राचे अध्यक्ष म्हणुन प्राचार्य, बी. जी. आंबटकर उपस्थित होेते.

संचालन उपप्राचार्य, बी. एम. राजूरकर, प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.बी बोढे तर आभार प्रदर्शन डॉ. एस.आर.विहिरकर यांनी केले. तांत्रिक सहकार्य श्री शेखर कुटे व गौरव जामुनकर यांनी केले.या चर्चासत्रात एकूण २५० व्यक्ती नोंदणी करून सहभागी झाले होते. आपल्या राज्यातील अनेक विद्यापिठातील तसेच राज्याबाहेरील लोकांचा देखील यात सहभाग होता.चर्चासत्राच्या यशस्वीते साठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.