हणेगाव येथील राजेश पंदरगे व किरण पाटील वझरकर यांची राष्ट्रवादीच्या तालुका उपाध्यक्ष पदी निवड

23

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

हणेगाव(दि.११जून):- हणेगाव येथील सामाजिक कार्यकर्ता व राज नर्सरीचे मालक राजेश काशिनाथ पंदरगे तसेच वझर येथील युवा सामाजिक कार्यकर्ते ‌किरण पाटील ‌यांच्या कार्याची दखल घेत देगलूर येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात या दोघांच्या कार्याची पावती म्हणून राष्ट्रवादीच्या देगलूर तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

हे दोघे रमेश देशमुख शिळवणीकर यांचे ते कट्टर समर्थक असलेले व हनेगाव विभागात प्रत्येक कार्यात सहभागी होऊन प्रत्येक नागरिकांच्या समस्या, त्यांची अडचण सोडवण्यासाठी सदा अग्रेसर असतात त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर आणि पक्षाचे नेते रमेश देशमुख शिळवणीकर,अकुश देसाई,लक्ष्मीकांत पदमवार,बालाजी रोयलावार यांच्या हस्ते नियुक्ती पञ देऊन नियुक्त करण्यात आले. या निवडीमुळे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.