IIT कंपनी मुंबईच्या टीमने केली नायगाव तालुक्यातील कुंटूर या गावची पाहणी

31

✒️चांदु आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)

नायगाव(दि.13जून):-स्वच्छ भारत अभियान(ग्रामीण) या प्रकल्प अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापना बाबत IIT कंपनी मुंबई ची टीम नायगाव तालुक्यातील कुंटूर या गावची पाहणी करण्यासाठी आली होती.

गावातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी चे ठिकाण आणि गावातील नाली ओढ्या विषयी त्यांना माहिती देताना कुंटूर नगरीचे सरपंच प्रतिनिधी मारोतराव पा.कदम कुंटूरकर, ग्रामसेवक दंमकोडवार साहेब , शिवाजी रेनेवाड उपस्थित होते.