केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाला ०२ ते ०५ टक्के हमीभाव घोषणा तोकडी- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांचे सरकारला निवेदन

27

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.१२जुन):-मागील ०५ वर्षापासून नापिकीच्या संकटात निसर्गाच्या प्रकल्पामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना सन २०२१ चा केंद्र सरकारने शेतमालाला घोषित केलेला हमीभाव ०२ ते ०५ टक्क्यांनी वाढून तोंडाला पाने पुसली आहे.
शेतीमध्ये सालदराचे भरमसाठ वाढले असून शेतमजुरीची रोजी वाढली आहे. शेतामध्ये ट्रॅक्टर सर्व यंत्रसामग्रीचा वापर करताना शेतीला कास दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंत्रसामग्रीसाठी पेट्रोल,डिझेलचा वापर करीत आहे. यंत्रणासामग्रीचा वापर करून शेती तयार करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खर्चात भरमसाट वाढ झाली आहे.

केंद्र सरकारने सण २०२१-२२ या वर्षातील खरीप पिकासाठी शेतमालाचा हमीभाव घोषित करताना उत्पादन खर्चावर आधारित शेतकऱ्यांना भाव दिला नाही. त्यामुळे शेतकरी सुजलाम् सुफलाम् होईल अशी परिस्थिती दिसत नसल्यामुळे शेतकरी अंधकारमय चाकोरीतून वाटचाल करीत आहे.
केंद्र सरकारने सन २०२१-२२ खरीप पिकांसाठी नवीन हंगामात शेतमालाला हमीभावाची घोषणा केली आहे. केंद्रातील कृषी मंत्रालयाने कपाशीच्या हमी भावात २०० रुपयाची वाढ, सोयाबीनचा हमीभावात ७० रुपयाची वाढ, मक्याच्या हमीभावात 20 रुपयाची वाढ करण्याची घोषणा केली. शेतमालाला ठरविलेला हमीभाव हा शेतकऱ्यांच्या पिकात प्रति क्विंटल किती खर्च येतो?

हे गृहीत धरले जाते त्यासोबत नफा जोडून कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव ठरविला जातो परंतु केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलची झालेली दरवाढ, महागाईमुळे वाढलेले उत्पादन खर्च, शेतमजुराची मजुरी, वखरण, डवरण, निंदन, फवारणी, शेणखत इत्यादी खर्चाचा समन्वय साधला नाही. उलट ०२ ते ०५ टक्के शेतमालाची हमीभाव घोषित करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.

केंद्र सरकारने हमीभाव जाहीर करण्यासाठी विचारात घेतलेल्या खर्चासाठी कापूस ०३ हजार ८१७ रुपये, सोयाबीन ०२ हजार ६३३ रुपये, ज्वारी ०१ हजार ८२५ रुपये, धनाला ०१ हजार २९३,मका ०१ हजार २४६ ,तुर ०३ हजार ८८६,मुंग ०४ हजार ८५०,उडीत ०३ हजार ८१६,शेंगदाना ०३ हजार ६९९,सूर्यफूल ०४ हजार १० रुपये,०१ हजार २९३ रुपये,रायी ०२ हजार २५१ रुपये प्रतिक्विंटलच्या खर्चात उत्पादित करता येते असे सुचविले आहे परंतु या तोकड्या हमीभावात उत्पादन घेणे अशक्य असल्याने शेतकरी वर्गात असंतोषाचे वातावरण पसरले आहे.

केंद्र सरकारच्या सोयाबीन पिकाच्या हमीभावाचा विचार केल्यास 01 बॅगची किंमत बाजारात ०३ हजार ५०० कृपया आहे आणि सरकारने दिलेल्या हमीभाव ०२ हजार ६३३ रुपये आहे. अशाप्रकारे हमीभाव घोषित करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांची विटंबना केली आहे.भारत सरकारच्या कृषी मंत्र्यांनी पिकांचे ट्रायल प्लॉट निर्माण करून उत्पन्न घेऊन दाखवावे त्याबद्दलचा मुद्दा केंद्र सरकारला पाठविला आहे. अशा प्रकारचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी सरकारला दिले आहे.