घाटनांदूर परिसरात विद्युत तारा चोरणारी टोळी सक्रिय

26

✒️राहुल कासारे(अंबाजोगाई प्रतीनीधी)मो:-9763463407

घाटनांदूर(दि.15जून):-शेतातील विद्युत खांबावरील विद्युत तारा चोरीच्या घटनात गेल्या एक महिन्यात वाढ झाली असून परिसरात विद्युत तारा चोरणारी टोळी सक्रिय झाली असून टोळीस पकडण्याचे आवाहन पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. गेल्या एक महिन्यापूर्वी घाटनांदूर शिवारातील संजय रानभरे यांच्या शेतातील चार विद्युत खांबावरील विद्युत तार चोरट्यानी रात्रीतून चोरली तर अशाच प्रकारे मूर्ती (ता.अंबाजोगाई) शिवारातील शेतातील विद्युत तार (ता.१०) गुरुवारी रात्री चोरीस गेली आहे.

गेल्या एक महिन्यात शेतातील विद्युत खांबावरील विद्युत तारा चोरीच्या घटना वाढल्या आहेत.वीज वितरण कंपनी शेतात नवीन कनेक्शन घेण्यासाठी विद्युत तारा, विद्युत खांबासहित खाजगी गुत्तेदार गुत्ते देत असल्याने.लहान- सहान गुत्तेदार किंवा गुत्तेदाराकडील कामगार शेतातील विद्युत खांब, ताराची चोरी करीत असल्याची दबक्या आवाजात चर्चा केली जात आहे.