कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला अटकाव घालण्यासाठी रांजनी येथे जनजागृती कार्यक्रम

22

✒️गेवराई तालुकाप्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.15जुन):-रोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसरी लाट येण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात जाणून कोरोनाविषयी जनजागृती करण्याचे काम रुग्ण सेवा समिती गेल्या काही दिवसांपासून करत आहे.त्यामुळे आज रांजनी येथे समिती मार्फत कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी डॉ अनिल दाभाडे यांनी या आजाराविषयी सविस्तर माहिती दिली.पहिल्या लाटेनंतर आपण काही चुका केल्या त्यामुळे आपल्याला दुसऱ्या लाटेला सामोर जावं लागलं.त्या कोणत्या चूका होत्या आणि त्या या वेळेस कशा टाळायच्या याविषयी मार्गदर्शन केले.

तसेच यावेळेस आलेल्या स्ट्रेन च्या नवीन लक्षणाविषयीही माहिती दिली.दोन मास्क चा वापर करा,लसिकरण करून घ्या अशी आव्हाने केली.समितीचे शिरीष भोसले यांनी कोरोनविषयी काही अडचण आल्यावर किंवा काही गरज लावल्यावर समितीशी संपर्क करा असे सांगितले.तसेच समितीचे रोहन दाभाडे यांनी आजाराला न घाबरता गांभीर्याने घ्या अशी विनंती केली.

समितीच्या वतीने 18 वर्षांखालील मुलांसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.यावेळी समितीचे करण दाभाडे, यश काळे यांचीही उपस्थिती होती.शेवटी गावचे उपसरपंच बळीराम कदम यांनी गावाच्या वतीने समितीचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.