पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर गुन्हा दाखल करा

32

🔹प्रेस संपादक व पत्रकार संघाचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन

✒️लातूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

लातूर(दि.15जून):- जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात दैनिक पुढारीचे पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर वाळू माफियाकडून प्राणघातक हल्ला केला होता त्या अनुषंगाने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिलीप वळसे पाटील गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मुरुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांच्यामार्फत निवेदन देऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.दिलेल्या निवेदनात विस्तृत असे म्हटले आहे की, पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे जिल्हा जालना तालुका जाफराबाद येथे त्यांच्यावर वाळू माफिया कडून प्राणघातक हल्ला दिनांक ११/०६/२०२१ रोजी झाला होता.

या हल्ल्यामुळे ते गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले आहे त्यांच्यासमवेत असणारे विलास पाबळे, सतीश मुठे यांनाही बेदम मारहाण करण्यात आली होती.ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर हल्ला करण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांनी दैनिक पुढारी या वृत्तपत्रातून वाळू माफिया विरुद्ध बातमी प्रसारित केली होती बातमी का प्रसारित केली म्हणून वाळूमाफियांनी त्यांना लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली होती.

या प्राणघातक हल्ल्याचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने जाहीर निषेध करून संबंधित आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात यावी असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या निवेदनावर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर तालुका अध्यक्ष तथा तहसीलचे संपादक बाळासाहेब जाधव,सामनाचे पत्रकार जयदीप सुरवसे, तहसील एखातियार दखनी, दैनिक देशोन्नतीचे पत्रकार दत्ता गोरे, दैनिक राजधर्मचे पत्रकार श्रीकांत टिळक, मांडले मंजुत, पांडुरंग गिरी, तेज नगरीचे संपादक मोह्ममद पिंजारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.