मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय तात्काळ निकाली काढण्यात यावा

37

🔸एम.आय .एम गेवराईने सादर केले पालकमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन

✒️गेवराई तालुका,प्रतिनिधी(नवनाथ आडे)

गेवराई(दि.15जून):-सच्चर कमिटीच्या अहवालानुसार सन – 2014 साली मुस्लिम समाजाला शिक्षणात व नौकरी मध्ये 5 टक्के आरक्षण देण्यात आले होते परंतु हे आरक्षण 2014 साली महाराष्ट्रात महायुती चे सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर रद्ध करण्यात आले, मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण हे कायदेशीर दृष्टीने योग्य असून सुद्धा सरकारच्या जातीयवादी धोरणाने हे आरक्षण रुद्ध झाले व 2019 मध्ये महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होऊन सुद्धा आज यावर कोणीही बोलण्यास तयार नाही .मागास मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे आरक्षण खूप गरजेचे आहे.

व न्यायालयाला ही मान्य असलेलेल्या या 5 टक्के आरक्षणाचा विषय तात्काळ निकाली काढून मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे ही मागणी एम आय एम गेवराईच्या वतीने पालकमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन देऊन करण्यात आली. पालकमंत्री मुंडे हे रविवार दिनांक 14 रोजी एका कार्यक्रमानिमित्त गेवराई येथे आले असता एम आय एम चे तालुकाध्यक्ष मोमीन एजाज सर यांनी पालकमंत्र्यांकडे ही मागणी केली त्यावर पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मागणीची दखल घेतली व लवकरच यावर तोडगा काढू असे आश्वासीत केले. यावेळी शेख युनूस, शेख शाफिक, शेख हारिस,सय्यद सिराज, शेख अयाज व कार्यकर्ते उपस्थित होते.