प्रधानमंत्री आवास योजना -ग्रामीण व राज्य पुरस्कृत घरकुल लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश

25

✒️पुसद प्रतिनिधी(बाळासाहेब ढोले)

पुसद(दि.16जून):- पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत घरकुल-योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश सोहळादि.१५ जुन२०२१रोजी पुसद पंचायत समिती सभागृहात सभापती सौ.छाया अर्जुनराव हगवणे यांच्या हस्ते सन्मान पत्र व चावी देऊन पार पडला.

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्स्फरसिंगच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांशी संवाद साधला असल्यामुळे लाभार्थ्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले.प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत घरकुल योजने अंतर्गत “महाआवास अभियान” २० नोहेंबर 2020 ते ५जुन२०२१ या कालावधीत सोई-सुविधा असलेले उत्कृष्ट घरकुल बांधकाम केल्याबद्दल लाभार्थ्यांना सन्मानपत्रव चावी देऊन तयार झालेल्या घरकुल लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश सोहळा पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

यावेळी तालुक्यातील श्रीरामपूर ग्रामपंचायतीचे व मोहा (ई) ग्रामपंचायतीचे तसेच बोरगडी ग्रामपंचायतचे लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती.

या कार्यक्रमाला पुसद पंचायत समिती सभापती सौ.छायाताई अर्जून हागवणे, उपसभापती भगवान भाकरे, गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखेडे, विस्ताराधिकारी टि.डी.चव्हाण, कनिष्ठ सहाय्यक श्रीकृष्ण गीते,स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गजेंद्र गुबरे,स्था.अ.साहाय्यक राजु पुरी, डी.ई.ओ.निलेश होले, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता दिनेश आडे, अंकुश जाधव, वैभव घोरपडे, सुयोग संघई, राहुल इंगळे, करण धुळे,कुणाल आडे, आकाश राठोड,मोहा (ई)ग्रा.प.चे ग्रामसेवक ए.बी.जाधव सरपंच सौ,वर्षा मनवर. कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.