धरणगाव येथे राजकीय ओबीसी आरक्षण अबाधित राखण्यासाठी तहसीलला निवेदन

31

🔸बहुजन क्रांती मोर्चा आक्रमक..

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगाव(दि.19जून):- स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवावे, व मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी यांनाही पदोन्नतीत आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी धरणगाव शहरातील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. याबाबत मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शासनाचे प्रतिनिधी मा.तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाने राज्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द ठरविले आहे. त्यामुळे हे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर धरणगाव येथे बहुजन क्रांती मोर्चा व ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली.

निवेदन सादर प्रसंगी मा.तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना ओबीसी नेते ऍड.शरद माळी, पी.डी. पाटील सर, सुनील पंढरीनाथ चौधरी यांनी सांगितले की, सर्वाेच्च न्यायालयात दाखल झालेल्या राजकिय आरक्षण संदर्भातील खटल्यात राज्य शासनाने व केंद्र शासनाने गांभीर्याने पाहावे. ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडावी. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवावे, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण कायम करावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी. असे सांगितले. सकल ओबीसी राजकीय आरक्षण व जातीनिहाय जनगणनाची करण्याची मागणी करण्यात आली. वरीलप्रमाणे मागणी मान्य न झाल्यास भविष्यात बहुजन क्रांती मोर्चा व ओबीसी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा बहुजन नेते व्ही.टी. माळी सर यांनी दिला.

ओबीसी समाजातील माळी, तेली, भावसार, कुणबी, सुतार, सोनार, बडगुजर, मुस्लिम, शिंपी व जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, ओबीसी समाजातील भावसार समाजाचे सर्वश्री. सुभाष भावसार, संजय भावसार, माळी समाजाचे हेमंत माळी सर, गोरख देशमुख, राजेंद्र महाजन, तेली समाजाचे संजय वामन चौधरी, चेतन ठाकरे, सोनार समाजाचे जितेंद्र सोनार, दिपक सोनार, योगेश सोनार, कुणबी समाजाचे लक्ष्मण पाटील सर, जितू पाटील (महाराज), विक्रम पाटील, दिनेश भदाणे, वाल्मिक पाटील, बडगुजर समाजाचे सुनील बडगुजर, दिनेश बडगुजर, सुतार समाजाचे विश्वास शिरसाठ, भरत शिरसाठ, शिंपी समाजाचे मुन्ना जगताप, सूर्यवंशी मराठे समाजाचे ऍड. कैलास मराठे, सीताराम मराठे, वाणी समाजाचे योगेश येवले यासोबत ओबीसी बांधवांच्या आरक्षण मागणीला बुद्धिस्ट समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते मा.मिलिंद पवार सर, गौतम गजरे, निलेश पवार, सिद्धार्थ पारेराव, खुशाल सोनवणे, विकास पवार, मयूर भामरे यांनी पाठिंबा दर्शविला. यावेळी बहुजन क्रांती मोर्चा संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ, माळी महासंघाचे पदाधिकारी तथा पत्रकार जितेंद्र महाजन, नगरसेवक सुरेश महाजन, मोहन महाजन, भागवत चौधरी, विलास महाजन, मनोज माळी, सी.एम.भोळे सर, सुनील देशमुख सर, ललित मराठे, विकास लांबोळे, विशाल महाजन, सीताराम मराठे, रामचंद्र माळी, करीम लाला मोमीन, नगर मोमीन, अविनाश चौधरी, गोपाळ चौधरी, अरविंद चौधरी, सतिश शिंदे, सिराज कुरेशी, बाळू चौधरी, महेंद्र तायडे, बाळासाहेब जाधव, सुनील लोहार, देवानंद चव्हाण व पाळधी येथील ओबीसी कार्यकर्ते भूषण माळी, सचिन पवार, आबा माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश अहिरे, सपोनि अमोल गुंजाळ, पोहेकॉ. वैभव बाविस्कर, प्रवीण पाटील, मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, अनिल सातपुते, दिपक वैदू आदी पोलीस कर्मचारी बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवला.