चंद्रपूर जि.प. समाज कल्याण सभापती नागराजभाऊ गेडाम यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त पत्रकार राहुल मैंद यांना कॅलेंडर आणि डायरींचे वाटप

    74

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    ब्रम्हपुरी(दि.19जून):- जिल्हा परिषद चंद्रपूरचे समाज कल्याण सभापती सन्माननीय श्री नागराज भाऊ गेडाम यांनी आज ब्रम्हपूरी तालुक्याचा दौरा केला.जुगनाला येथे विविध विकास कामांचे भूमीपुजन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आले होते

    यावेळी जि.प.चंद्रपूरच्या समाजकल्याण विभागामार्फत कॅलेंडर आणि डायरीचेे वाटप जि. प. पदाधिकारी आणि पं. स. पदाधिकारी तसेच अनेकांना करण्यात आले .सकाळचे लोकप्रिय पत्रकार श्री राहुल मैंद यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून नागराज भाऊ गेडाम यांनी राहुल मैंद यांना डायरी आणि कॅलेंडर देऊन वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या

    यावेळी जिल्हा परिषद चे सदस्य तसेच जिल्हा संघटन महामंत्री सन्माननीय श्री संजयजी गजपुरे,पं.स.सभापती प्रा. रामलाल महादेव दोनाडकर, जिल्हा परिषद सदस्या अॅड. दिपालीताई मेश्राम ,उपसभापती सौ. सुनीताताई बाबुरावजी ठवकर,माजी सभापती तथा सदस्या सौ. प्रणालीताई प्रमोद मैंद, पंचायत समिती सदस्य श्री प्रकाशभाऊ ननावरे ,पंचायत समिती सदस्या सौ. उर्मिलाताई प्रेमलाल धोटेे ,पंचायत समिती सदस्या सौ. ममताताई दिवारू कुंभारे ,माजी सभापती श्री रविभाऊ मेश्राम तसेच युवा नेते श्री ज्ञानेश्वरजी पाटील दिवटे ठेकेदार ,भाजपा सोशल मीडिया संयोजक श्री अविनाशजी मस्के , भाजपा सोशल मीडिया संयोजक श्री धीरज पाल ,सिंदेवाही पंचायत समितीचे सदस्य तथा गटनेते श्री. रितेशभाऊ अलमस्त हे उपस्थित होते.