गुंजकर कोचिंग क्लासेस मध्ये NEET, JEE व MH-CET क्रॅशकोर्सची प्रवेश प्रक्रिया सुरू

35

🔸मर्यादित जागा,विद्यार्थ्यांनी त्वरित प्रवेश घेण्याचे आवाहन

✒️खामगाव प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.19जून):-गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे विश्वासनिय दालन असलेल्या प्रा. रामकृष्ण गुंकजर सरांच्या गुंजकर कोचिंग क्लासेस मध्ये NEET,JEE व MH-CET क्रॅशकोर्सची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. जागा मर्यादित असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.मेडिकल, इंजिनिअरिंग प्रवेशासाठी आवश्यक असणारी NEET ,JEE व MH-CET ही पूर्व परीक्षा लवकरच होणार आहे.

या अनुषंगाने मेडिकल, इंजिनिअरिंगला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुंजकर कोचिंग क्लासेस वामन नगर खामगाव येथे 24 जून पासून क्रॅशकोर्सच्या बॉचेसला प्रारंभ होणार आहे. परीक्षेला अल्प कालावधी असल्याने तीन ते साडेतीन महिन्यात या परीक्षेचा संपूर्ण क्रॅशकोर्स पूर्ण करून घेतला जाणार आहे. शासनाने घालून दिलेल्या कोविड नियमांचे पालन करून व विध्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या सर्व उपाय योजना करून ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने हे क्लासेस घेण्यात येणार आहेत. तरी खामगावसह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी त्वरित गुंजकर कोचिंग क्लासेस वामन नगर खामगाव येथे संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्रा. रामकृष्ण गुंजकर सर यांनी केले आहे.