घुंगराळा ग्रामपंचायत च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

26

✒️माधव शिंदे(नांदेड, जिल्हा प्रतिनिधी)

नायगाव(दि.20जून):-तालुक्यातील घुंगराळा येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने घुंगराळा येथील खंडोबा मंदीर परिसरात नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे,नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी फांजेवाड, घुंगराळा ग्रामपंचायत च्या सरपंच श्रीमती राधाबाई जोगेवार, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा उपसरपंच वसंत सुगावे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सोळा तालुक्याचे गटविकास अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा घुंगराळा ग्रामपंचायत चे उपसरपंच वसंत सुगावे पाटील यांनी केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते कडूनिंब,वड, पिंपळ, सप्तपर्णी, बकुळा, गुलाब, मोगरा या वनस्पतींची 200 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल ग्रामपंचायत कार्यालयाचे कौतुक केले.

ग्रामपंचायत च्या वतीने आजपर्यंत करण्यात आलेल्या कामांची माहिती घेऊन केलेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त केले.या कार्यक्रमास नागरिकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गोविंदराव पांचाळ, सौ. लक्ष्मीबाई ढगे, सौ.गयाबाई ढगे, गंगाधर सूर्यवंशी, सुनील यलपलवाड, सौ. रंजना कांचलवाड,सौ.किसनाबाई कळकटवाड, ग्रामसेवक महेश्वर कदम उपस्थित होते.यावेळी परिसरातील नागरिक प्रामुख्याने सहभागी झाले होते.