✒️बुलढाणा प्रतिनिधी(मनोज नगरनाईक}

बुलढाणा(दि.20जून):-जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात राहणारे दत्तू ईजाळे गाव- सुरा, येथिल रहिवाशी अपंग व्यक्तींच्या शेतामध्ये काही गावांतील लोकांना कडुन अतिक्रमण केल होत त्या अनुषंगाने 18/06/2021रोजी त्या संदर्भात अात्मदहनाचा इशारा दिला होता त्या निवेदनाची दखल घेऊन गटविकास अधिकारी मा. अधिकारी इंगळे साहेब पोलिस कर्मचारी उगले व विस्तार अधिकारी सुरडकर यांच्या आश्वासना नंतर दत्तू ईजाळे याणि आपला आत्मदहन चा ईशारा वापस घेतला.

या वेळी प्रमुख उपस्थिती मध्ये भुजंगराव मांटे माजी सैनिक, संदीप म्हस्के तालुका अध्यक्ष प्रहार अपंग क्रांती संस्था देउलगाव राजा , शंकर शिरगुळे प्रहार अपंग क्रांती आंदोलन संस्था, गणराज गावंडे अपंग जनता दल आदीसह तसेच जयश्रीताई गिते जिल्हा प्रहार अपंग क्रांती संस्था यांनी मा. तहसीलदार मॅडम, बीडीओ साहेब देऊळगाव यांच्या सोबत भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून संपूर्ण विषयावर चर्चा केली व बीडीओ साहेबांना त्वरीत अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी सूचित केले. मा. तहसीलदार मॅडम यांनी श्री. इजाळे यांच्या प्रकरणात दोन दिवसात आदेशीत करू अशी माहीती जयश्रीताई गिते यांना दिली.प्रहार अपंग क्रांती संस्था बुलढाणा यांच्या वतीने श्री. इजाळे यांना न्याय मिळणार असल्याचे दिसुन येत आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED