कोरोनाच्या नावाखाली गेल्या दीड वर्षांपासून शिक्षणाचा खेळ- खंडोबा

23

🔹प्रशासनाने शाळा तात्काळ चालू करावेत अन्यथा विध्यार्थासाठी पालक रास्ता रोको करणार – माधव पवार

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)

नायगाव(दि.21जून):- तालुक्यातील व ग्रामीण भागातील पालक वर्ग आपल्या पाल्याचे शिक्षण वाया जातअसल्याचा संताप
व्यक्त करीत म्हणू लागले की राज्य शासनाने कोरोना महामारीच्या नावाखाली गेल्या दीड वर्षांपासून सर्व शाळा बंद ठेवल्यामुळे विध्यार्थाच्या शिक्षणाचे अतोनात नुकसान होत असल्यामुळे शासनाने तात्काळ शाळा सुरळीत करावयात नाही केल्यास आमच्या पाल्याच्या शिक्षणासाठी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून रास्ता रोको करण्याचा पालकानी इशारा दिला आहे.

राज्यात व जिल्ह्यात गेल्या दीड वर्षा पासून पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेले व जीवनातील उगवती पिढी म्हणजे छोटे छोटे मुल आणि मुली यांनी अध्याप ही शाळेचे द्वारच पाहिले नसल्यामुळे एक पिढी कोरोना महामारीच्या नावाखाली वाया गेली म्हणजे साक्षर होण्या ऐवजी निरीक्षर झाली असल्यामुळे विध्यार्थाच्या पालकात संताप व्यक्त केला जात असून शासन दरबारी आंधळं दळतंय कुत्र पिठ खातोय असी प्रशासनाची अवस्था झाली असल्याने नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यानी तात्काळ लक्ष देण्याची गरज असून शिक्षक शहरात विध्यार्थी खेड्यात असी परिस्थिती निर्माण झाली आहे