दुर्लक्षित राहिलेल्या “योध्या”ला अखेर “कोरोना योध्दा”म्हणून मिळाला सन्मान

48

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

म्हसवड(दि.21जून):-कोरोना काळात गेली दीड वर्षे प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणारे म्हसवड नगरपरिषदेत कर्मचारी असणारे गणेश म्हेत्रे यांना “माणरत्न सोशल फाउंडेशन” यांच्या वतीने म्हसवड नगरपरिषद म्हसवड मुख्याधिकारी डॉ.सचिन माने यांच्या हस्ते आज “कोरोना योध्दा” म्हणून “माणरत्न” प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.कोरोना महामारीच्या काळात माणूस माणसाला जवळ घेत नसताना गणेश याने म्हसवड नगरपरिषदेकडून जी काही जबाबदारी दिली जाईल ती अंत्यत प्रामाणिकपणे पार पाडत मी पण एक “कोरोना योद्धा” आहे हे वेळोवेळी सिद्ध केले.

गेल्या दीड वर्षांपासून गणेश याने कोरोनाची कोणतीही भीती न बाळगता म्हसवड शहर- वासीयांना आपल्या हातात माईक घेऊन मास्क लावणे,सामाजिक अंतर ठेवणे,कोरोणाची लस घेतलीच पाहिजे यांच्या सूचना तो वारंवार शहरात फिरून नागरिकांना देत असे.गणेश हा “पोलीस मित्र”पण आहे लॉक डाऊन काळात आपले काम पाहत त्याची पोलिसांना आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांना वेलोवेळी मदत राहिली आहे.

गेली तीन महिन्यापासून म्हसवड शहरात कोरोनांने थैमान घातले असताना गरीब गरजू लोकांचेवर उपासमारीची वेळ आली यादरम्यान म्हसवड नगरपरिषदेने गरिबांना दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून अन्नदानाचा उपक्रम राबविला त्या उपक्रमाची जबाबदारी गणेशवर पडल्यावर त्याने दोन्ही वेळी गरीब गरजू लोकांना जेवण न चुकता पुरवायचे काम अंत्यत प्रामिकपणे केले.तरीपण हा “योध्दा” कायम दुर्लक्षित राहिला अखेर त्याच्या या प्रामाणिक कामाची दखल घेत “माणरत्न सामाजिक फौंडेशन”ने गणेश याला “कोरोना योद्धा”म्हणून सन्मानित केले.
आणि आज गणेश खऱ्या अर्थाने म्हसवडकराचा गणेश झाला या सन्मानाबद्दल गणेशचे सर्व स्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.