अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन गंभीर जखमी व त्यात लहान मुलांचा समावेश आहे

27

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)

गेवराई(दि.21जून):- तालुक्यातील सावरगाव रोड वरील साठेवाडी फाट्याजवळ दिनांक 20 रविवारी रोजी दुपारी अज्ञात वाहनाने दुसऱ्या सुराला जोराची धडक दिली या अपघातात दुचाकीवरील तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे कोळगाव करून गेवराई कडे जाणाऱ्या एम एच 23AE5268 दुचाकीस भरधाव असलेल्या वाहनांनी जोरदार धडक दिली घटनास्थळावरून वाहनचालकांनी पोब्रा केला या अपघातातील शिरूर तालुक्यातील कानोबा ची वाडी येथील जाधव कुटुंबातील आहे.

यामध्ये 1 गंभीर जखमी अवस्थेत जागेवर बेशुद्ध झाला तर दोघे जखमी झाले असून यामध्ये एका छोट्या मुलाचा समावेश आहे जखमींना सामाजिक कार्यकर्ते सुधाकर जाधव व जयसिंग डोंगरे यांनी रुग्णवाहिका बोलून त्यांना जिल्हा रुग्णालय बीड येथे हलविण्यात आले आहे रोज अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे त्यामुळे अपघात रोखण्यासाठी योग्य ते प्रशासनाने आणि उपाय योजना करणे गरजेचे बनले आहे