✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई विभाग प्रतिनिधी)मो:-8080942185
केज(दि.21जून):-वाढत्या महागाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी चे केज तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन सविस्तर माहिती अशी की आज संपूर्ण देशामध्ये वाढती महागाई मुळे सर्व सामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत आहे म्हणून आज वंचित बहुजन आघाचे अध्यक्ष मा एॅड बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी च्या वतिने कोरोणाच्या काळात वाढत्या महागाईच्या निषेधार्थ पेट्रोल, डिझेल, खाद्यपदार्थ, तेल, गॅस यांचे वाढलेले भाव यांच्या विरोधात केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या विरोधात व महागाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी केज याचे धरणे आंदोलन करण्यात आले.
या वेळी तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के, शहर अध्यक्ष बाबा मस्के , विशाल भैय्या धिरे, नवनाथ पौळ, आॅल इंडिया पॅंथर सेना युवा अध्यक्ष अजिंक्य धिरे, आकाश आदमाणे संजय सोनवणे व ईतर वंचिताचे कार्यकर्ते उपस्थित होते.