बीड जिल्ह्यात तीन टक्के पेरण्या काही ठिकाणी ओलं तर काही ठिकाणी पडली कोरड

26

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)

गेवराई(दि.22जून):-जून महिन्यामध्ये चांगला पाऊस पडला. पाऊस झाल्याने शेतकर्‍यांने बि-बियाणे खरेदी करुन पेरणीला सुरूवात केली. आज स्थितीत जिल्ह्यात तिन ते साडेतिन टक्के पेरण्या झाल्या. जिल्ह्यातील काही भागात पेरणी योग्य ओल आहे तर काही ठिकाणी मात्र कोरड पडली. गेवराईसह अन्य भागामध्ये लागवड झाल्यानंतर पाऊस झाल्या नसल्याने तेथील शेतकरी पावसाची वाट पाहू लागले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नामांकीत बियाणंसह रासायनीक खताचा तुटवडा दाखवत काही व्यापारी शेतकर्‍यांची आर्थीक लूट करत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षापासून पाऊस चांगला साथ देवू लागला. त्यामुळे कृषी उत्पन्नात मोठी वाढ झाली. यावर्षी मान्सुनने जून महिन्यामध्ये दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. पाऊस पडल्यानंतर शेतकर्‍यांने बि-बियाणंसह रासायनीक खते खरेदी करण्यास सुरूवात केली. आतापर्यंत जिल्ह्यात तिन ते साडेतिन टक्यापर्यंत पेरणी झाली. जिल्ह्याचं खरीपाचं क्षेत्र आठ लाख हेक्टरपर्यंत आहे. यात चार ते साडे चार लाखापर्यंत कापसाची तर दोन ते अडिच लाखापर्यंत सोयाबीनची लागवड होते. मात्र यंदा सोयाबीनच्या पेर्‍यात वाढ होणार आहे. गेल्यावर्षी सोयबीनला शेवटच्या टप्यात चांगला भाव मिळाला.